esakal | हवाई दलात पायलट व्हायचंय ! "यांना' मिळते संधी; जाणून घ्या सविस्तर

बोलून बातमी शोधा

Air Force
हवाई दलात पायलट व्हायचंय ! "यांना' मिळते संधी; जाणून घ्या सविस्तर
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : तुम्हाला हवाई दलात पायलट व्हायचं आहे? भारतीय हवाई दलात पायलट होण्यासाठी फ्लाइंग ब्रॅंचमध्ये दाखल होणे आवश्‍यक आहे. एअरफोर्स फ्लाइंग ब्रॅंचमध्ये फायटर पायलट, हेलिकॉप्टर पायलट किंवा ट्रान्स्पोर्ट पायलट म्हणून देशाची सेवा करण्याची संधी आहे. एअर फोर्स फ्लाइंग ब्रॅंचमध्ये प्रवेश घेण्यासाठीच्या विविध पात्रतेनुसार वेळोवेळी भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. जाणून घ्या त्यासंदर्भात...

अशी आहे भरती प्रक्रिया...

ग्रॅज्युएटसाठी प्रवेश आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) प्रवेश. जेथे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) च्या एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा (सीडीएसई), राष्ट्रीय कॅडेट कॉर्पोरेशन (एनसीसी) प्रवेश आणि एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट (एएफसीएटी किंवा एफसीएटी) द्वारे फ्लाइंग ब्रॅंच दरवर्षी दोनदा टेस्ट घेते. तर, वरिष्ठ माध्यमिक / उच्च माध्यमिक / इंटरमीजिएट स्तरावर यूपीएससीतर्फे वर्षातून दोनदा घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) परीक्षेद्वारे प्रवेश दिले जातात. या दोन्ही स्तरांच्या प्रवेशासाठी आवश्‍यक पात्रता आणि निवड प्रक्रिया समजून घेऊया.

हेही वाचा: रेल्वे मंत्रालयाची राईट्‌स कंपनी करणार विविध पदांची भरती ! "असे' करा ऑनलाइन अर्ज

उच्च माध्यमिक स्तरावर फिजिक्‍स आणि मॅथेमॅटिक्‍ससह 10+2 उत्तीर्ण युवक वायुसेनेतील फायटर पायलट होण्याकरिता एअर फोर्स फ्लाइंग ब्रॅंचमध्ये प्रवेश घेण्यासाठी यूपीएससीच्या एनडीए परीक्षेत सहभागी होऊ शकतात. एनडीए परीक्षेसाठी वयोमर्यादा 16.5 वर्षे ते 19.5 वर्षे निश्‍चित केली आहे. यूपीएससी एनडीए परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्‍शन बोर्डने (एसएसबी) घेतलेल्या मुलाखत फेरी आणि वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागते. एसएसबीमधील यशस्वी उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेच्या आणि हवाई दलाच्या पसंतीनुसार एनडीए खडकवासलामध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. यानंतर, हवाई दलाच्या प्रशिक्षण तळावर विशेष प्रशिक्षण दिले जाते. यशस्वीरीत्या प्रशिक्षण घेतलेल्या कॅडेट्‌सना हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून कायमस्वरूपी नेमणूक दिली जाते, जिथे त्यांना हवाई दलाच्या स्टेशनवर पायलट म्हणून काम करण्याची संधी मिळते.

हेही वाचा: "सीबीएसई'ने 2022 च्या परीक्षांचे बदलले स्वरूप ! आता रट्टामार चालणार नाही

ग्रॅज्युएट तरुणांबद्दल बोलायचं तर, ग्रॅज्युएट उमेदवार यूपीएससीच्या सीडीएस परीक्षा, एनसीसी स्पेशल एंट्री आणि एएफसीएटी परीक्षेद्वारे फ्लाइंग ब्रॅंचमध्ये प्रवेश घेऊ शकतात. सीपीएस परीक्षेसाठी यूपीएससीकडून ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात वर्षातून दोनदा जाहिरात दिली जाते. सीडीएस परीक्षेस बसण्यासाठी उमेदवार 10 + 2 पातळीवर फिजिक्‍स आणि मॅथेमॅटिक्‍स मध्ये पास असावा, तसेच कोणत्याही शाखेत पदवी प्राप्त केलेला किंवा बीई / बीटेक पास असावा. उमेदवाराचे वय 20 ते 24 वर्षे असावे. सीडीएस परीक्षेत यशस्वी घोषित झालेल्या उमेदवारांना एनडीए प्रमाणेच एसएसएची मुलाखत व वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागेल आणि त्यानंतर गुणवत्ता व हवाई दलाच्या पसंतीनुसार प्रशिक्षण अकादमीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. यशस्वी प्रशिक्षणानंतर फ्लाइंग ऑफिसर म्हणून कायमस्वरूपी नेमणूक दिली जाते, जिथे त्याला हवाई दलाच्या स्टेशनवर पायलट म्हणून काम करण्याची संधी मिळते.

त्याचप्रमाणे एनसीसी एंट्री अंतर्गत उमेदवारांनी कमीतकमी बी ग्रेडमध्ये एनसीसीच्या एअर विंगमध्ये सी सर्टिफिकेट उत्तीर्ण केलेले असावे आणि कोणत्याही शाखेमध्ये पदव्युत्तर किंवा बीई / बीटेक पदवी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावी. उमेदवारांचे वय 20 ते 24 वर्षे असावे. भारतीय वायुसेना एनसीसी प्रवेशासाठी जून आणि डिसेंबर महिन्यात वर्षातून दोनदा एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात देते. एनसीसी प्रवेशामधून निवडलेल्या पुरुष किंवा महिला कॅडेट्‌सना फ्लाइंग ब्रॅंचमध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्ती दिली जाते.

एअरफोर्स फ्लाइंग ब्रॅंचमध्ये फ्लाइंग ऑफिसर होण्यासाठी पदवीधारकांना तिसरा पर्याय म्हणजे एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट म्हणजे एफसीएटी. शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएसीसी) एफसीएटी प्रवेशाच्या उमेदवारांना हवाई दलात जास्तीत जास्त 14 वर्षांसाठी नेमणूक दिली जाते. एफसीएटी परीक्षेची जाहिरात हवाई दलाकडून जून आणि डिसेंबरमधील रोजगार वृत्तांत प्रसिद्ध केली जाते. फ्लाइंग ब्रॅंचची पात्रता कोणत्याही विषयात कमीतकमी 60 टक्के गुणांसह बॅचलर किंवा बीई / बीटेक पदवी आहे. उमेदवारांचे वय 20 ते 24 वर्षे असावे.