esakal | रेल्वे मंत्रालयाची राईट्‌स कंपनी करणार विविध पदांची भरती ! "असे' करा ऑनलाइन अर्ज

बोलून बातमी शोधा

RITES
रेल्वे मंत्रालयाची राईट्‌स कंपनी करणार विविध पदांची भरती ! "असे' करा ऑनलाइन अर्ज
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : रेल्वे मंत्रालयांतर्गत केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील एक उपक्रम आणि मिनी रत्न कंपनी राईट्‌स (RITES) लिमिटेडने प्रशिक्षणार्थींच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. गुरुवारी, 22 एप्रिल 2021 रोजी कंपनीने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस (आयटीआय पास) च्या एकूण 146 रिक्त पदांवर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक उमेदवार राईट्‌स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट rites.com वर उपलब्ध असलेल्या भरती जाहिरातीमध्ये दिलेल्या प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात. 22 एप्रिलपासून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून 12 मे 2021 पर्यंत उमेदवार ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतील.

हेही वाचा: कोरोनामुळे एमटीएस टियर 1 सीबीटी परीक्षा स्थगित ! 'डीआरडीओ'ची घोषणा

कोण अर्ज करू शकतात?

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये चार वर्षांची डिग्री पूर्ण करणे आवश्‍यक आहे. तथापि, नॉन- इंजिनिअरिंग उमेदवार बीए किंवा बीबीए किंवा बीकॉम उत्तीर्ण किंवा तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा आयटीआय पास असावा.

असा करा ऑनलाइन अर्ज

राइट्‌स लिमिटेडमध्ये अप्रेंटिस रिक्त पदांसाठी विहित अर्जाच्या प्रक्रियेचे तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना राष्ट्रीय प्रशिक्षण योजना (एनएटीएस) पोर्टल mhrdnats.gov.in वर नोंदणी करा. यानंतर उमेदवारांना राईट्‌स द्वारा दिलेला ऑनलाइन फॉर्म (लिंक अधिसूचनेमध्ये) भरावा लागेल. यानंतर सबमिट केलेल्या फॉर्मची पीडीएफ प्रत 12 मे 2021 पर्यंत ई- मेल आयडी ritesapprenticerecruitment2021@gmail.com वर पाठवा. या व्यतिरिक्त, उमेदवारांना अधिसूचनेसह दिलेला फॉर्म भरून कागदपत्र पडताळणीसाठी न्यावा लागेल.

पात्रतानुसार रिक्त पदे

  • इंजिनिअरिंग डिग्री : 76 पदे

  • नॉन-इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट : 20 पदे

  • इंजिनिअरिंग डिप्लोमा : 15 पदे

  • आयटीआय पास : 35 पदे

स्टायफंड किती मिळेल?

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस : 14 हजार रुपये दरमहा

  • डिप्लोमा अप्रेंटिस : 12 हजार रुपये दरमहा

  • ट्रेड अप्रेंटिस (आयटीआय पास) : 10 हजार रुपये दरमहा