esakal | "सीबीएसई'ने 2022 च्या परीक्षांचे बदलले स्वरूप ! आता रट्टामार चालणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

CBSE

"सीबीएसई'ने 2022 च्या परीक्षांचे बदलले स्वरूप ! आता रट्टामार चालणार नाही

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन : सीबीएसई) 2022 साठी नववी ते बारावीच्या परीक्षेचा नमुना जाहीर केला आहे. नवीन पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर आकलनानुसार प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

मे महिन्यापासून सुरू होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी बदललेला पॅटर्न बनविण्यात आला होता, परंतु कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली असून बारावीच्या परीक्षेबाबत संभ्रम आहे. अशा परिस्थितीत सीबीएसई, दिल्लीने 22 एप्रिलला जाहीर केलेला पॅटर्न नववी आणि अकरावी वर्गासाठीही सुरू राहणार आहे. आता विद्यार्थ्यांसमोर जे प्रश्न येतील ते यावर आधारित असतील.

हेही वाचा: आता पहिल्या वर्गातील प्रवेश यादी आज होणार नाही जाहीर ! केंद्रीय विद्यालयाची घोषणा

नववी व दहावीचा पॅटर्न

  • 20 टक्के प्रश्न बहुपर्याय निवड आणि सराव यावर आधारित होते; परंतु आता 30 टक्के प्रश्न बहुपर्याय निवड, केस स्टडी आणि सोर्सवर आधारित असतील.

  • 20 टक्के प्रश्न केस स्टडी आणि सोर्सवर आधारित असायचे, त्यातील 20 टक्के प्रश्न आता वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील.

  • 60 टक्के प्रश्नांची उत्तरे लहान स्वरूपाची होती, पण आता 50 टक्के प्रश्नांची उत्तरे थोडक्‍यात असतील.

अकरावी आणि बारावी वर्गाचा पॅटर्न

  • 20 टक्के प्रश्न बहुपर्यायी व वस्तुनिष्ठवर आधारित होते ज्यात आता बहुपर्यायी, केस स्टडी व सोर्सवर आधारित असतील. तसेच 20 टक्के प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील.

  • 70 टक्के प्रश्न लघुत्तरी होते, आता 60 टक्के प्रश्नांची उत्तरे थोडक्‍यात असतील.

loading image