esakal | "एसबीआय'च्या पाच हजार पदांच्या भरतीसाठी असा असणार परीक्षा नमुना आणि निवड प्रक्रिया !

बोलून बातमी शोधा

SBI
"एसबीआय'च्या पाच हजार पदांच्या भरतीसाठी असा असणार परीक्षा नमुना आणि निवड प्रक्रिया !
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने 27 एप्रिल 2021 पासून एसबीआय लिपिक भरती 2021 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरील sbi.co.in वर 5000 हून अधिक ज्युनिअर एसोसिएट पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. प्राथमिक परीक्षा जून 2021 मध्ये तात्पुरती असेल. लिपिक पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार एसबीआय लिपिक भरती 2021 नमुना व निवड प्रक्रिया येथे पाहू शकतात.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेत एक ऑनलाइन परीक्षा (प्राथमिक आणि मुख्य परीक्षा) आणि एक स्थानिक भाषेचा पेपर असेल. जे प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भाषा चाचणीसाठी बोलावले जाईल. तथापि, ज्यांनी विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेत अभ्यास केला आहे, त्यांना कोणत्याही भाषेची चाचणी घेण्यास भाग पाडले जाणार नाही. याचा अर्थ त्यांचा भाषेचा पेपर घेतला जाणार नाही. इतरांच्या बाबतीत (निवडीस पात्र) निवडलेली स्थानिक भाषा चाचणी तात्पुरत्या निवडीनंतर परंतु सामील होण्यापूर्वी घेतली जाईल.

हेही वाचा: विद्यापीठे व महाविद्यालयांच्या आगामी परीक्षा व प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याची होतेय तयारी

परीक्षेचा नमुना

पहिला टप्पा : प्राथमिक परीक्षा : 100 गुणांसाठी वस्तुनिष्ठ परीक्षा ऑनलाइन घेण्यात येईल. ही परीक्षा तीन भागात विभागली जाईल. ही परीक्षा एक तासाची असेल. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असतील.

यामध्ये इंग्रजी भाषेच्या 30 मार्कांसाठी 30 प्रश्न असतील. ज्यासाठी आपल्याला 20 मिनिटे मिळतील. न्यूमेरिकल एबिलिटीच्या 35 मार्कांसाठी 35 प्रश्न येतील, त्यासाठी 20 मिनिटे मिळतील. याशिवाय 35 मार्कांसाठी 35 प्रश्न रीझनिंगमधून येतील. त्यासाठी 20 मिनिटे देखील मिळतील. अशा प्रकारे एक तासात 100 प्रश्न सोडवावे लागतील.

दुसरा टप्पा : मुख्य परीक्षा : 2 तास 40 मिनिटांची मुख्य परीक्षा असेल. ही परीक्षा एकूण 200 मार्कांची असेल. यामध्ये चार खंडांत एकूण 190 प्रश्न विचारले जातील. वस्तुनिष्ठ चाचण्यांमध्ये सामान्य इंग्रजी परीक्षा वगळता इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रश्‍न असतील. यात निगेटिव्ह मार्किंगही असेल. सामान्य / आर्थिक जागरूकता 50 मार्कांसाठी 50 प्रश्न असतील. त्यासाठी 35 मिनिटे मिळतील. 40 मार्कांसाठी 40 प्रश्न सामान्य इंग्रजीमधून असतील. त्यासाठी 35 मिनिटे मिळतील. 50 मार्कांसाठी 50 प्रश्न क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडसाठी असतील. यासाठी 45 मिनिटे मिळतील. रिझनिंग एबिलिटी आणि कॉम्प्युटर ऍप्टिट्यूडच्या 60 मार्कांसाठी 50 प्रश्न असतील. त्यासाठी 45 मिनिटे मिळतील. अशाप्रकारे एकूण 200 मार्कांचे 190 प्रश्न 2 तास 40 मिनिटांत द्यावी लागेल.