विद्यार्थ्यांंनो, सेल्फ स्टडीचा सोपा फॉर्म्युला

संतोष शाळिग्राम
Tuesday, 14 July 2020

सध्या कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला येणारे यश किंवा अपयश हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ स्टडी, म्हणजेच स्वतः केलेला अभ्यास. स्वयंअध्ययनाचे फायदे आज आपण समजून घेणार आहोत.

सध्या कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला येणारे यश किंवा अपयश हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ स्टडी, म्हणजेच स्वतः केलेला अभ्यास. स्वयंअध्ययनाचे फायदे आज आपण समजून घेणार आहोत.

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्वयंअध्ययनाकडे आपण दुर्लक्ष करत असतो. मग प्रश्न पडतो. सेल्फ स्टडी एवढा महत्त्वाचा आहे का? तर होय. खूप महत्त्वाचा आहे. कारण सेल्फ स्टडीमध्ये एकतर विद्यार्थी स्वतःला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. स्वतःच्या चांगल्या आणि चुकीच्या सवयी त्याला लवकर कळतात. ज्या वेळेस विद्यार्थी स्वतःला चांगल्याप्रकारे ओळखतो तेव्हाच त्याची प्रगती उत्तम प्रकारे होत असते.

लॉकडाऊनने हिरावला हॉटेल चालकांच्या तोंडचा घास; अडीच लाख कामगारांचा रोजगार टांगणीला

बहुतेक विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडी कसा करावा हेच समजत नाही. पुस्तकांचे समजून न घेता फक्त वाचन करणे व पाठांतर करणे याचा अर्थ 'सेल्फ स्टडी' होत नाही. माझ्या अनुभवानुसार सेल्फ स्टडी करण्याच्या काही सोप्या पद्धती पुढील प्रमाणे आहेत.

कल्याणीनगर, खराडी, चंदननगर परिसरात लाॅकडाउनला मिळाला 'असा' प्रतिसाद 

पद्धत 1: 3R फॉर्म्युला 
सेल्फ स्टडी मध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. 3R फॉर्म्युला. म्हणजेच Read, Remembar, Reproduce याचाच अर्थ असा की, १.पुन्हा पुन्हा वाचा, २.वाचलेले लक्षात ठेवा, ३.लक्षात ठेवलेले कागदावर लिहून ठेवा 

पद्धत २ : सारांशलेखन
पुस्तकांचे पुन्हा-पुन्हा वाचन करावे. समजून घेऊन त्याचा सारांश काढावा म्हणजेच जर परिच्छेद मोठा असेल, तर ३ ते ४ ओळीत सारांश काढावा. परीक्षेच्या आधी उजळणी करताना हा सारांश खूप महत्त्वाचा ठरतो.

पद्धत ३: उद्याचे वाचन आज
सेल्फ स्टडी करण्याची आणखी एक सोपी पद्धत म्हणजे विद्यार्थ्यांनी धडा किंवा चाप्टर शिक्षकांनी  शिकवण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचवा.

शिक्षक तो धडा शिकवत असताना नीट लक्ष देऊन ऐकणे व समजून घेणे आणि पुन्हा एकदा वाचणे अश्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून आपण उद्या काय शिकणार आहोत याची माहिती करून घ्यावी.

पद्धत ४:  शिकवता शिकवता शिकणे
सेल्फ स्टडी  करण्याचा अजून एक उत्तम मार्ग म्हणजे शिकविता शिकविता शिकणे. आपल्या मित्रांना शिकविण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा दुहेरी फायदा होतो. एका बाजूने आपला अभ्यास चांगला होतो व दुसऱ्या बाजूने ज्ञानदान केल्याचे श्रेय मिळते. आपल्याला तो विषय चांगला समजल्याशिवाय आपण तो दुसऱ्यांना शिकवू शकत नाही.

थोडक्यात सेल्फ स्टडी करणे म्हणजे, 3R फॉर्म्युला, सारांश लेखन, उद्याचे वाचन आज, शिकवता शिकवता शिकणे या पद्धती टप्या टप्याने आत्मसात करणे.

- मनिष गार्डी (सहाय्यक प्राध्यापक, जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हडपसर)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Self Study Easy Formula