esakal | India Post Recruitment : भारतीय पोस्ट विभागात GDS पदांची भरती! दहावी पास उमेदवारांना संधी
sakal

बोलून बातमी शोधा

indian post

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती 29 ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

भारतीय पोस्ट विभागात GDS पदांची भरती! दहावी पास उमेदवारांना संधी

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : भारतीय टपाल (Indian Post) विभागाने जीडीएस (GDS) पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. टपाल विभाग भरती प्रक्रियेअंतर्गत जम्मू - काश्‍मीर (Jammu-Kashmir) सर्कलसाठी ग्रामीण डाक सेवकाच्या 266 पदांची नियुक्ती केली जाणार आहे.

कोणताही उमेदवार जो या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आणि इच्छुक असेल तो @appost.in वर अर्ज करू शकतो. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती 29 ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारांनी लक्षात घ्यावे, की वेळेत अर्ज करावा, कारण कधी कधी शेवटच्या क्षणी अधिकृत वेबसाइटवर लोड वाढल्यामुळे तांत्रिक समस्या उद्‌भवू शकतात.

हेही वाचा: न्यूक्‍लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ट्रेड अप्रेंटिस पदांची भरती

टपाल विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, विहित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 सप्टेंबर 2021 पर्यंत 18 ते 40 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सूट देण्यात येईल. यासह यूआर / ओबीसी / ईडब्ल्यूएस पुरुष / ट्रान्समन श्रेणीतील उमेदवारांना या पदासाठी अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील. अर्ज शुल्कात सर्व महिला / ट्रान्स - महिला उमेदवारांसाठी, सर्व एससी / एसटी उमेदवार आणि सर्व पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी सूट आहे. उमेदवार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज फी भरू शकतात.

हेही वाचा: UPSC मुलाखतीला मिळालेत सर्वाधिक गुण; वाचा पहिला प्रश्न आणि उत्तर

जाणून घ्या शैक्षणिक पात्रता

GDS च्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारत सरकार/ राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेशांच्या कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय म्हणून अभ्यास केलेले) मध्ये दहावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. याशिवाय उमेदवाराने किमान दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास असणे अनिवार्य आहे. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

loading image
go to top