'NEET'चा निकाल ऑक्‍टोबरनंतरच! NTA ने रिओपन केली करेक्‍शन विंडो

NEET परीक्षेचा निकाल ऑक्‍टोबरनंतरच! NTA ने रिओपन केली करेक्‍शन विंडो
NEET
NEETCanva
Summary

राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (UG) - 2021 निकालाच्या घोषणेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा थोडी अधिक वाढली आहे.

सोलापूर : राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (UG) - 2021 निकालाच्या घोषणेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा थोडी अधिक वाढली आहे. परीक्षा आयोजित करणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने वैद्यकीय आणि दंत प्रवेशासाठी इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (UG) - 2021 म्हणजेच NEET (UG) 2021 च्या अर्जामध्ये मागितलेल्या उमेदवारांच्या नोंदणी तपशिलात सुधारणा किंवा त्रुटी दुरुस्ती केली आहे. करेक्‍शन विंडो पुन्हा एकदा उघडण्यात आली आहे.

NEET
डीआरडीओमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती! 'या' तारखेपासून करा अर्ज

एजन्सीने गुरुवारी, 21 ऑक्‍टोबर रोजी परीक्षा पोर्टल neet.nta.nic.in वर जारी केलेल्या नवीन सूचनेनुसार, NEET (UG) 2021 देशभरातील उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाले. या अर्जांमध्ये दुरुस्तीसाठी उमेदवारांकडून आलेल्या विनंतीनुसार, ऍप्लिकेशन विंडो 21 ऑक्‍टोबर ते 26 ऑक्‍टोबर 2021 च्या रात्री 11.50 पर्यंत पुन्हा उघडले जात आहे. असे मानले जाते, की आता NEET चा निकाल अर्ज दुरुस्तीनंतरच NTA द्वारे जाहीर केला जाईल.

NEET UG 2021 अर्जामध्ये दुरुस्ती कशी करावी?

ज्या उमेदवारांना त्यांच्या NEET UG 2021 अर्जामध्ये सुधारणा किंवा सुधारणा करायच्या आहेत, त्यांनी परीक्षा पोर्टलला भेट दिल्यानंतर, होम पेजवर दिलेल्या अर्ज दुरुस्तीच्या लिंकवर क्‍लिक करावी. मग अर्ज क्रमांक आणि पासवर्डद्वारे नवीन पेजवर लॉग इन करून उमेदवार NTA द्वारे निर्धारित केलेल्या त्यांच्या अर्जाच्या मर्यादित तपशिलांमध्ये आवश्‍यक सुधारणा किंवा त्रुटी सुधारू शकतात.

NEET
सहाय्यक प्राध्यापकांच्या 1091 पदांसाठी भरती! जाणून घ्या सविस्तर

केवळ 'या' तपशिलांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते

NTA द्वारे जारी NEET (UG) 2021 अर्ज सुधारणा नोटिशीनुसार, उमेदवारांना त्यांच्या अर्जाच्या काही तपशिलांमध्ये सुधारणा किंवा दुरुस्ती करण्याची परवानगी आहे. या तपशिलांमध्ये पहिल्या टप्प्यातील तपशील - लिंग, राष्ट्रीयत्व, ई-मेल पत्ता, कॅटेगरी, सब कॅटेगरी तसेच फेज II यामध्ये सादर केलेले सर्व तपशील समाविष्ट आहेत. यासह, एजन्सीने म्हटले आहे की, उमेदवारांनी या अर्ज दुरुस्तीला त्यांची शेवटची आणि अंतिम संधी मानली पाहिजे; कारण त्यानंतर कोणतीही संधी दिली जाणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com