esakal | अकरावी प्रवेशाची तिसरी कटऑफ यादी जाहीर! 'या' वेबसाईटवर तपासा
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावी प्रवेशाची तिसरी कटऑफ यादी जाहीर! 'या' वेबसाईटवर तपासा

महाराष्ट्र प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (FYJC) प्रवेश 2021 साठी तिसरी गुणवत्ता यादी आज (ता. 13) जाहीर करण्यात आली आहे.

अकरावी प्रवेशाची तिसरी कटऑफ यादी जाहीर! 'या' वेबसाईटवर तपासा

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : महाराष्ट्र प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (First year junior college - FYJC) प्रवेश (FYJC Admission) 2021 साठी तिसरी गुणवत्ता यादी आज (ता. 13) जाहीर करण्यात आली आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये अकरावी इयत्तेमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात, त्यांनी अधिकृत वेबसाईट 11thadmission.org.in वर गुणवत्ता यादी 2021 तपासावी. तिसरी गुणवत्ता यादी आज सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली होती. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी ट्‌विटरवर FYJC ची तिसऱ्या गुणवत्ता यादीची तारीख जाहीर केली होती. 13 सप्टेंबर रोजी तिसऱ्या फेरीसाठी वाटप यादी आणि कट ऑफ यादी प्रदर्शित केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली होती. तसेच नंतर प्रवेशासाठी विशेष फेरी असेल. त्याचवेळी तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर देखील जाहीर करण्यात आले होते.

हेही वाचा: 'ECIL'मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! 16 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

अशी तपासा तिसरी गुणवत्ता यादी

तिसरी गुणवत्ता यादी तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम अधिकृत वेबसाइट 11thadmission.org.in ला भेट द्यावी. पुढे मेन पेजवर उपलब्ध असलेल्या प्रदेशावर क्‍लिक करावी. आता तुम्ही एका नवीन पेजवर याल. येथे विद्यार्थी लॉगइन लिंकवर क्‍लिक करा. आता तुमचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. त्यानंतर वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची यादी स्क्रीनवर प्रदर्शित होईल. विद्यार्थ्यांनी ती तपासावी व भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढून ठेवावी.

हेही वाचा: ICAI ने सीए फाउंडेशन व अंतिम परीक्षा निकालाची केली तारीख घोषित

तिसऱ्या फेरीची कटऑफ यादी अधिकृत वेबसाइटवर देखील जारी केली गेली आहे. कटऑफ यादी तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि होम पेजवर उपलब्ध असलेल्या संबंधित प्रदेशावर क्‍लिक करावे लागेल. पुढे कटऑफ विभागातील नियमित फेरी 3 साठी कटऑफ सूची लिंकवर क्‍लिक करा. क्‍लिक केल्यानंतर कटऑफ सूची तुमच्या सिस्टीममध्ये डाउनलोड होईल. विद्यार्थी ते तपासू शकतात. फेरी 3 च्या प्रवेशाच्या अधिक तपशिलांसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. फेरी 3 च्या प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

loading image
go to top