esakal | आयुर्वेद क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी ! जाणून घ्या अभ्यासक्रम अन्‌ पात्रता
sakal

बोलून बातमी शोधा

Ayurveda

आयुर्वेद क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी ! जाणून घ्या अभ्यासक्रम अन्‌ पात्रता

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

आपल्या देशातील आयुर्वेदावरील श्रद्धा आणि लोकांचा विश्वास प्राचीन काळापासून आहे. परंतु कोव्हिडच्या प्रादुर्भावानंतर लोकांचा त्यावरचा विश्वास आणखी वाढला आहे.

सोलापूर : आपल्या देशातील आयुर्वेदावरील (Ayurveda) श्रद्धा आणि लोकांचा विश्वास प्राचीन काळापासून आहे. परंतु कोव्हिडच्या (Covid-19) प्रादुर्भावानंतर लोकांचा त्यावरचा विश्वास आणखी वाढला आहे. यादरम्यान घरोघरी योग, प्राणायाम तसेच वाफ घेणे, काढा पिणे आणि अन्नामध्ये औषधी मसाल्यांचा योग्य वापर यावर जोर वाढला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harshavardhan) यांनी नुकत्याच दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोव्हिड-19 साथीच्या आजारानंतर आयुर्वेदाच्या अर्थव्यवस्थे मोठी वृद्धी झाली आहे. गेल्या एका वर्षात आयुर्वेदिक औषधे आणि उत्पादनांच्या मागणीत झालेल्या प्रचंड वाढीवरून हे दिसून येते, की भारत आणि जगात आयुर्वेदिक उत्पादनांकडे कल किती वेगाने वाढत आहे. (There are many job opportunities in the field of Ayurveda in India)

हेही वाचा: IGNOU : असाइनमेंट सादर करण्यासाठी आता 15 जूनपर्यंत मुदत !

बऱ्याच अभ्यासांमधून असे दिसून आले आहे, की विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती बळकट असावी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या गुणधर्मांमुळे आयुर्वेद या संक्रमण काळात प्रत्येकासाठी अधिक विश्वासार्ह झाला आहे. वास्तविक, लोकांना निरोगी ठेवणे हे आयुर्वेदाचे मूळ उद्दिष्ट आहे. आयुर्वेदात निरोगी जीवनशैली टिकवून ठेवण्यावर खूप जोर दिला जात आहे. कोरोना कालावधीत आयुष मंत्रालयाने शिफारस केलेले आयुष-64, आयुष क्वाथ, संशमनी वटी, फिफाट्रोल, लक्ष्मीविलास रस ही आयुर्वेदिक औषधे आजकाल बरीच चर्चेत आहेत. आयुर्वेदिक / नैसर्गिक उपायांवरील लोकांच्या या वाढत्या आस्थेमुळे आयुर्वेदिक चिकित्सकांचीही मागणी वाढत आहे. असा विश्वास आहे, की येत्या काही वर्षांत या क्षेत्रात नोकरी / रोजगाराच्या संधी अधिक वाढतील.

Homeopathy

Homeopathy

नोकरीची शक्‍यता वाढत आहे वेगाने

साथीच्या आजारांच्या युद्धामध्ये केंद्र सरकारने सुरवातीपासूनच ऍलोपॅथी (Allopathy) औषध तसेच योग / प्राणायाम आणि आयुर्वेदिक औषधांवर खूप जोर दिला आहे. आयुष मंत्रालयाने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार, काढ्यापासून औषधांपर्यंत रुग्णांना दिली जात आहेत. उल्लेखनीय आहे की नॅचरोपॅथी आणि त्याच्या संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी नोव्हेंबर 2014 मध्ये आयुष मंत्रालयाची स्वतंत्र स्थापना केली गेली, जी प्राचीन चिकित्सा प्रणालींना (योग, आयुर्वेद, निसर्गोपचार, युनानी आणि होमिओपॅथी Homeopathy) प्रोत्साहन देते. याशिवाय आयुर्वेदात प्रशिक्षण देण्याच्या अभ्यासावरही भर दिला जात आहे. चार वर्षांपूर्वी एम्ससारखी पहिली अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (नवी दिल्ली) आयुर्वेदाच्या प्रचारासाठी देशाला समर्पित करण्यात आली. पंतप्रधान म्हणाले की, देशातील प्रत्येक जिल्ह्यात आयुर्वेदाशी जोडलेले रुग्णालय असले पाहिजे. त्या दिशेने सरकार काम करीत आहे, हे स्पष्ट आहे.

Ayurveda Medicine

Ayurveda Medicine

नोकरीच्या विविध संधी

दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानसह देशातील सर्व सरकारी रुग्णालयात आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार केले जात आहेत. खासगी रुग्णालयांमधील आयुर्वेदात तज्ज्ञांचीही मागणी आहे. अशी अनेक क्‍लिनिक / आरोग्यसेवा केंद्रे लहान आणि मोठ्या शहरात सुरू केली जात आहेत, जिथे लोकांना समग्र उपचार दिले जातात. देशभरातील अशा सर्व औषध कंपन्यांमध्ये आजकाल अशा प्रशिक्षित लोकांची मोठी मागणी आहे, जे आयुर्वेदिक औषधे आणि उत्पादनांच्या संशोधन आणि विकासामध्ये सहकार्य करू शकतात. एमिल, वैद्यनाथ, हमदर्द, डाबर, हिमालया यांसारख्या अनेक कंपन्या आयुर्वेदिक सिरप आणि इतर औषधे मोठ्या प्रमाणात तयार करतात, ज्याचा वापर जवळजवळ प्रत्येक घरात केला जातो. संपूर्णपणे, आयुर्वेदात योग्य शिक्षण घेतल्यानंतर तरुणांना संधीची कमतरता भासत नाही. बीएएमएससारख्या कोर्समध्ये पदव्युत्तर पदवी घेऊन आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षक म्हणून करिअर करता येते. आयुर्वेदिक डॉक्‍टर म्हणून खासगी प्रॅक्‍टिस करता येते, आयुर्वेदिक औषधांचे दुकान स्वतः उघडता येते.

Ayurveda Chikitsa

Ayurveda Chikitsa

हेही वाचा: चंद्रकांत पाटलांआधीच सांगोल्याच्या प्राध्यापकाने केली शरद पवारांवर पीएचडी !

अभ्यासक्रम आणि पात्रता

पात्र आयुर्वेदिक प्रॅक्‍टिशनर होण्यासाठी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक चिकित्सा व शस्त्रक्रिया (बीएएमएस) करणे आवश्‍यक आहे. हा साडेपाच वर्षांचा कोर्स आहे. हा अभ्यासक्रम पीसीबी विषयातून बारावी पूर्ण केल्यानंतर 50 टक्के गुणांसह करू शकतो. एमबीबीएस प्रमाणे बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमांचे प्रवेशही एनईईटी (राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा) मार्फत केले जातात. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) दरवर्षी ही परीक्षा घेते. तपशिलासाठी एनटीएच्या संकेतस्थळावर (https://ntaneet.nic.in) भेट द्या.

आयुर्वेदाच्या प्रमुख संस्था

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, दिल्ली

https://aiia.gov.in

गुजरात आयुर्वेद विद्यापीठ, जामनगर

www.ayurveduniversity.edu.in

बीएचयू, वाराणसी

www.bhu.ac.in

आयपी युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली

www.ipu.ac.in

उत्तराखंड आयुर्वेद विद्यापीठ, डेहराडून

https://uau.ac.in

एज्युकेशन-जॉब्स