esakal | रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांची जम्बो भरती! 4 ऑक्‍टोबरपासून करा अर्ज | RRC Apprentice Recruitment
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांची जम्बो भरती! 4 ऑक्‍टोबरपासून करा अर्ज

रेल्वे भरती सेल, पूर्व रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 3366 पदांची भरती केली जाईल.

रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांची जम्बो भरती! 4 ऑक्‍टोबरपासून करा अर्ज

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : रेल्वे भरती सेल, पूर्व रेल्वे (Railway Recruitment Cell, Eastern Railway) ने अप्रेंटिस पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती (Recruitment) प्रक्रियेद्वारे एकूण 3366 पदांची भरती केली जाईल. ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करावयाचा आहे ते RRC ER च्या अधिकृत साइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

नोंदणी प्रक्रिया 4 ऑक्‍टोबर 2021 पासून सुरू होणार असून, 3 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. अर्जदारांनी लक्षात घ्यावे, की शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. निवडलेल्या उमेदवारांची यादी 18 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित केली जाईल.

रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवाराने सरकारी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावीची परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. पदांशी संबंधित अधिक शैक्षणिक पात्रता अधिकृत वेबसाइटवर तपासून घ्यावी. उमेदवाराची वयोमर्यादा 15 वर्षे ते 24 वर्षे यादरम्यान असावी. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. अर्ज करताना सूचना काळजीपूर्वक वाचा, कारण फॉर्ममध्ये काही त्रुटी असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

हेही वाचा: न्यूक्‍लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ट्रेड अप्रेंटिस पदांची भरती

रिक्त पदांचा तपशील

  • हावडा : 659 पोस्ट

  • सियालदाह : 1123 पोस्ट

  • आसनसोल : 412 पोस्ट

  • मालदा : 100 पोस्ट

  • कांचरापाडा : 190 पोस्ट

  • लिलुआ : 204 पोस्ट

  • जमालपूर : 678 पोस्ट

हे शुल्क असेल

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जाचे शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तर SC, ST, PWAD आणि महिलांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बॅंकिंग आदींद्वारे फी भरता येते. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

हेही वाचा: भारतीय पोस्ट विभागात GDS पदांची भरती! दहावी पास उमेदवारांना संधी

अशा प्रकारे होईल निवड

प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. त्याचवेळी या पदाशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

loading image
go to top