ITI Admission 2021 : आयटीआयची गुणवत्तायादी मंगळवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटीआयची गुणवत्तायादी मंगळवारी

ITI : आयटीआयची गुणवत्तायादी मंगळवारी

पुणे : खासगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्टच्या सत्रातील प्रवेश सुरू झाले आहे. तिसऱ्या पाळीतील गुणवत्ता यादी मंगळवारी (ता.१६) घोषित करण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील प्रशिक्षण महासंचालनालयाने परवानगी दिल्यानंतर हे प्रवेश सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा: चित्रा वाघ यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

आयटीआयच्या तिसऱ्या पाळीतील प्रवेशासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे विहित वेळेत अर्ज सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील प्रवेश केंद्रीय पद्धतीने होत आहे. उपलब्ध जागांवर आणि संस्थास्तरीय जागांसाठीही ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहे.

हेही वाचा: भाजपने पैसे वाटले, दंगलीचं रचलं सुनियोजित षडयंत्र - नवाब मलिक

ऑनलाइन प्रवेश प्रणाली व्यतिरिक्त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरले जाणार नाही. अधिक माहितीसाठी https://admission.dvet.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

loading image
go to top