esakal | UPSC Mains Result 2020: मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा निकाल
sakal

बोलून बातमी शोधा

UPSC

मुलाखतीसाठीची ई-समन्स पत्रे यूपीएससीकडून लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

UPSC Mains Result 2020: मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा निकाल

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

UPSC Mains Result 2020: नवी दिल्ली/पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सनदी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. सनदी सेवेसाठीची मुख्य परीक्षा ८ जानेवारी ते १७ जानेवारी २०२१ या दरम्यान घेण्यात आली होती. त्याचा निकाल आता जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठीची अधिकृत लिंक बातमीच्या तळाशी देण्यात आली आहे. 

मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी (व्यक्तिमत्व चाचणी) निवडण्यात आले आहे. अधिकृत संकेतस्थळावर जारी केलेल्या सूचनेनुसार लवकरच मुलाखत घेण्यात येणार आहे. या सर्व मुलाखती नवी दिल्लीतील शहाजहान रोडवरील धोलपूर हाऊसमध्ये घेण्यात येणार आहेत. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट, सामाजिक प्रवर्गाचे प्रमाणपत्र तसेच विकलांग आणि खेळाडू उमेदवारांनी संबंधित प्रमाणपत्रे यांची पूर्तता करावी, असे कार्मिक मंत्रालयाने जाहीर केले आहे. 

एसबीआय भरणार आठ हजार क्‍लार्क पदे ! परीक्षेची पहिली प्रतीक्षा यादी जाहीर; असे करा रिझल्ट थेट डाउनलोड​

असा पाहा निकाल
यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग-इन केल्यानंतर नवीन काय या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर यूपीएससी सनदी सेवा मुख्य परीक्षा २०२० येथे क्लिक करा. त्यानंतर एक यादी प्रसिद्ध होईल. या यादीत तुमच्या परीक्षा क्रमांक तपासू शकता. 

UPSC Prelims 2021: अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस​

मुलाखतीसाठीची ई-समन्स पत्रे यूपीएससीकडून लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या परीक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलिस सेवा (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि इतर केंद्रीय सेवा (गट अ आणि ब) ची रिक्त पदे भरण्यात येतात. ही परीक्षा पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशी तीन टप्प्यात घेण्यात येते.

UPSC निकाल पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

UPSC Mains 2020 Result PDF डाउनलोड करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top