UPSC CSE Notification 2026 : UPSC नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरू

UPSC Civil Services Notification 2026 Released : ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे
UPSC CSE

UPSC CSE

esakal
Updated on

UPSC Civil Services Vacancy 2026 Notification :  केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२६ ची अधिसूचना जारी केली आहे. IAS, IPS आणि IFS सह नागरी सेवांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. त्यामुळे UPSC इच्छुकांसाठी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही अतिशय आनंदाची बातमी आहे.

या परीक्षेसाठी इच्छुक असणारे उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. आयोगाने इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ४ फेब्रुवारी पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी दिली आहे, जी २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू राहील.

या भरती मोहिमेत भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा, भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा सेवा, गट 'अ' आणि भारतीय नागरी लेखा सेवा, गट 'अ' यासह विविध नागरी सेवांमध्ये सुमारे ९३३ रिक्त पदे भरली जातील. यापैकी ३३ रिक्त जागा बेंचमार्क दिव्यांग असलेल्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.

UPSC CSE
Turkish Airlines Emergency Landing : २३६ प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या विमानाच्या इंजिनला अवघ्या काही मिनिटांतच लागली आग!

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा -

भारतीय प्रशासकीय सेवा (IAS): भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी असलेले उमेदवार या परीक्षेसाठी पात्र आहेत.

भारतीय वन सेवा (IFS) –

पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, कृषी यासारख्या विषयांमध्ये बॅचलर पदवी किंवा समकक्ष पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

UPSC CSE
Praful Patel reply Raj Thackeray Video: ‘’राज ठाकरे, वाकरे माझा काय संबंध? ते….’’ ; प्रफुल्ल पटेल पत्रकार परिषदेतच भडकले!

वयोमर्यादा –

 पात्र उमेदवारांचे वय १ ऑगस्ट २०२६ रोजी किमान २१ वर्षे आणि जास्तीत जास्त ३२ वर्षे असणे आवश्यक आहे. म्हणजेच त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९९४ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००५ नंतर झालेला नसावा. UPSC परीक्षा २०२६ नुसार अतिरिक्त वयात सूट लागू असेल. अधिक माहितीसाठी, अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत सूचना वाचावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com