UPSC EPFO Recruitment 2026 new date
esakal
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतील (EPFO) भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. Assistant Provident Fund Commissioner (APFC) पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख आता १४सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या पात्र उमेदवारांना आणखी एक संधी मिळाली आहे. या भरती प्रक्रियेत Enforcement Officer/Accounts Officer (EO/AO) आणि Assistant Provident Fund Commissioner (APFC) या पदांचा समावेश आहे.