UPSC Recruitment : 'या' पदांसाठी सरकारी नोकरी जाहीर

UPSC Recruitment
UPSC Recruitmentesakal

UPSC Recruitment 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत रिक्त पदांवरील भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. दरम्यान, या जागांसाठी इच्छुक उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर https://www.upsconline.nic.in ऑनलाइन अर्ज करू शकतात. (upsc-recruitment-2021-apply-for-the-post-of-senior-grade-of-indian-information-service)

Summary

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत रिक्त पदांवरील भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

या प्रक्रियेद्वारे भारतीय माहिती सेवेत वरिष्ठ दर्जाची एकूण 34 पदे भरली जाणार असून ही निवड भाषेच्या आधारावर होणार आहे. त्यामध्ये हिंदीसाठी 9 पदे, इंग्रजीसाठी 3 पदे, पंजाबी 3 पदे, तेलुगू 5 पदे, ओडिया 3 पदे, बंगाली 1 पदे, मराठी 5 पदे, गुजराती 1 पदे, आसामी 2 पदे आणि मणिपुरीसाठी 2 पदे भरण्यात येणार आहेत. एकूण 34 पदांपैकी 4 पदे एससीसाठी आरक्षित असून एसटीसाठी 2, ओबीसी 8, ईडब्ल्यूएस 3 पदे, जनरलसाठी 17 आणि पीडब्ल्यूबीडी प्रवर्गासाठी 2 पदे आरक्षित ठेवण्यात आली आहेत.

UPSC Recruitment
ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये करियरच्या अनेक संधी’

UPSC IB Ministry Recruitment 2021 साठी उमेदवाराकडे पदविका / पदव्युत्तर पदविका / पत्रकारिता / मास कम्युनिकेशनमध्ये पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, या क्षेत्रात उमेदवाराला साधारण 2 वर्ष कामाचा अनुभव असावा. या व्यतिरिक्त उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र, आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर 12 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

upsc-recruitment-2021-apply-for-the-post-of-senior-grade-of-indian-information-service

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com