UPSC Recruitment : यूपीएससीमध्ये वैज्ञानिक साहाय्यक पदासह ४३ पदांवर भरती

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर 2022 आहे.
UPSC Recruitment
UPSC Recruitment google

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक सारख्या अनेक पदांवर भरती सुरू केली आहे. या भरतीद्वारे एकूण ४३ पदे भरली जातील. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत ते अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन फॉर्म भरू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर 2022 आहे. (UPSC Recruitment 2022)

UPSC Recruitment
Government job : सीमा रस्ता संघटनेत ३२७ जागांवर भरती

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - 43

सहाय्यक कृषी विपणन सल्लागार – ५ पदे

वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – १८ पदे

स्पेशलिस्ट ग्रेड III - 4 पदे

कनिष्ठ खाण भूगर्भशास्त्रज्ञ - 7 पदे

सहाय्यक खाण भूगर्भशास्त्रज्ञ - 6 पदे

केमिस्ट – ३ पदे

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - २६ नोव्हेंबर २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ डिसेंबर २०२२

UPSC Recruitment
Government Job : दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; पगार ६९ हजार

वय मर्यादा

वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ४० वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वेगळी आहे.

अर्ज शुल्क

अर्ज करणार्‍या सामान्य श्रेणीतील उमेदवारांनी नोंद घ्यावी की त्यांना अर्ज शुल्क म्हणून 25 रुपये भरावे लागतील. SC, ST आणि महिला प्रवर्गासारख्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com