esakal | बसमधील एका घटनेनं बदललं आयुष्य आणि बनली IPS
sakal

बोलून बातमी शोधा

shalini agnihotri

एखादी घटना अशी असते की त्यामुळे आयुष्यच बदलून जातं. काही वेळा चांगल्या गोष्टी होतात तर काही वेळा वाईट. 

बसमधील एका घटनेनं बदललं आयुष्य आणि बनली IPS

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एखादी घटना अशी असते की त्यामुळे आयुष्यच बदलून जातं. काही वेळा चांगल्या गोष्टी होतात तर काही वेळा वाईट. आय़पीएस शालिनी अग्निहोत्री यांना एसटी बसमध्ये एका व्यक्तीने बोललेल्या वाक्यामुळे युपीएससी करण्याची इच्छा मनात आली. त्यानंतर शालिनी अग्निहोत्री युपीएससी उत्तीर्ण होऊन आयपीएस झाल्या. एका बस कंडक्टरच्या मुलीचा आय़पीएस होण्याचा प्रवास जाणून घेऊ.

हे वाचा - एक कोटी रुपये पगाराची नोकरी सोडून UPSC चा अभ्यास सुरु केला आणि...

शालिनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एकदा त्या आई सोबत बसने प्रवास करत होत्या. त्या बसमध्ये वडील कंडक्टर होते. जिथं आई बसली होती त्याच्या मागच्या सीटवर एक माणूस सीट पकडून उभा राहिला होता. तेव्हा आईने त्या व्यक्तीला हात बाजुला घेण्यास सांगितलं. मात्र ती व्यक्ती मोठ्याने दरडावत म्हणाली की तुम्ही कलेक्टर आहात का मी तुमचं ऐकायला'

दुसऱ्या प्रयत्नात झाला IAS, अधिकारी होण्यासाठी आई वडिलांनी दिली प्रेरणा

त्या व्यक्तीच्या एका वाक्याने लहान असलेल्या शालिनी यांच्या मनात अनेक प्रश्न आले. कलेक्टर कोण असतं. त्याचं सगळे कसे ऐकतात. लहान वयात पडलेल्या या प्रश्नांची उत्तरे शालिनी यांनी दहावीला असताना शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी माहिती घेतली आणि पोलीस अधिकारी होण्यचा निर्णय घेतला. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या शालिनीला घरच्यांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. शालिनी यांनी सांगितलं की, वडील बस कंडक्टर होत पण माझ्या शिक्षणासाठी त्यांनी कोणतीच कमी भासू दिली नाही. 

हे वाचा : खेडेगावातून थेट ऑक्सफर्ड ते पुन्हा भारतात, वयाच्या 27 व्या वर्षी बनली IPS

धर्मशाला इथल्या DAV स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर हिमाचल प्रदेश अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीत शालिनी ग्रॅज्युएशनसाठी गेली. तिथं शिकायला जाण्याआधी डोक्यात युपीएससीचा विचार नव्हता. मात्र त्याचवेळी लहानपणीची घटना आठवली आणि पोलिस अधिकारी होण्याचं ठरवलं. त्यासाठी तयारीला सुरुवात केली. दीड वर्षांच्या अभ्यासानंतर 2011 मध्ये युपीएससीची परीक्षा दिली होती. त्यात यश मिळवून शालिनी यांनी त्यांच्या बॅचमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता.

दहावी, बारावीनंतर पुढे काय? घाबरु नका; करियरसाठी 'या' आहेत नव्या वाटा

शालिनी यांनी 2011 मध्ये परीक्षा दिली. त्यांची मुलाखत मार्च 2012 मध्ये झाला होता. त्यानंतर मे महिन्यात लागलेल्या निकालात ऑल इंडिया रँकिंगमध्ये त्यांनी 285 वी रँक मिळवली होती. डिसेंबर 2012 मध्ये हैदराबाद इथल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्या दाखल झाल्या. सध्या कुल्लू जिल्ह्यात एसपी पदावर कार्यरत आहेत.