esakal | याच त्या 'लेडी सिंघम' ज्यांनी आमदाराला मारली होती थप्पड!
sakal

बोलून बातमी शोधा

IPS_Soumya_Sambasivan

२०१७मध्ये त्यांची बदली शिमला येथे करण्यात आली. यामुळे शिमलाची पहिली महिला बनण्याचा बहुमानही त्यांना मिळाला. मात्र, जेव्हा सौम्या यांची शिमला येथे बदली झाली, तेव्हा शिमल्यातील 'गुडिया रेप अॅण्ड मर्डर केस' या प्रकरणाची चर्चा देशभरात सुरू होती.

याच त्या 'लेडी सिंघम' ज्यांनी आमदाराला मारली होती थप्पड!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

UPSC Success Story IPS Soumya Sambasivan:
जेव्हा जेव्हा तडफदार महिला आयपीएस अधिकाऱ्यांची चर्चा होते, तेव्हा एक नाव हमखास डोळ्यासमोर येत ते म्हणजे आयपीएस सौम्या सांबशिवन यांचं. शिमलाची पहिली महिला पोलिस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सौम्या यांची ओळख तेवढ्यापुरतीच मर्यादीत राहिली नाही. तर हिमाचलमध्ये ड्रग्ज आणि मानवी तस्करी करणाऱ्यांचा काळ म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. कधीकाळी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी करणाऱ्या सौम्या आयपीएस झाल्या आणि त्यांच्या नावाची धडकी अपराध्यांच्या मनात कायमची घर करून बसली.

- पहिल्याच प्रयत्नात IPS झाल्यानंतरही पुन्हा परीक्षा देऊन बनली IAS

मूळच्या केरळच्या असणाऱ्या सौम्या या २०१०च्या बॅचच्या आयपीएस ऑफिसर (हिमाचल प्रदेश केडर). वडील इंजिनीअर आणि आई गृहिणी. सौम्या या त्यांच्या एकुलत्या एक कन्या. त्यामुळे साहजिकच त्या लाडीकोडात लहानाच्या मोठ्या झाल्या. लेखिका बनण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं. 

बायोलॉजीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर सौम्या यांनी एमबीएला प्रवेश घेतला. त्यानंतर २ वर्ष त्यांनी बँकेत नोकरी केली. नोकरी करत असतानाच त्यांनी यूपीएससीची तयारीही सुरू ठेवली होती. २०१०ची यूपीएससीची परीक्षा क्रॅक करत त्या आयपीएस बनल्या. आणि हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात त्यांचं पहिलं पोस्टिंग झालं. तेथे त्यांनी धडाक्यात कामगिरी करत अनेक गुंड आणि तस्करांना जेरीस आणलं. एवढं की काहीजणांनी तो जिल्हा सोडला, तर काहींनी तस्करीचा धंदा.

- वेळ आहे तर लागा कामाला; लॉकडाउननंतर 'या' क्षेत्रात आहेत भरपूर संधी!

त्यांच्याबद्दल आणखी एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. २०१६ मध्ये सिरमौरमध्ये एसपी म्हणून काम करत असताना त्यांनी एका आमदाराला त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल जोरदार थप्पड लगावली होती. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी त्या आमदाराची रवानगी जेलमध्ये केली होती. या प्रकरणाची देशभरात चर्चा झाली होती. आणि तेव्हापासूनच त्या 'लेडी सिंघम' म्हणूनही ओळखल्या जाऊ लागल्या.

२०१७मध्ये त्यांची बदली शिमला येथे करण्यात आली. यामुळे शिमलाची पहिली महिला बनण्याचा बहुमानही त्यांना मिळाला. मात्र, जेव्हा सौम्या यांची शिमला येथे बदली झाली, तेव्हा शिमल्यातील 'गुडिया रेप अॅण्ड मर्डर केस' या प्रकरणाची चर्चा देशभरात सुरू होती. 

- जुळ्या बहिणींची कमाल! सर्व विषयात मिळवले सेम टू सेम गुण

सौम्या यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या मुलींना एक विशेष ट्रेनिंगही देत आहेत. आपल्यासोबत काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी एक खास स्प्रे तयार करण्याचं ट्रेनिंग त्या हिमाचलमधील मुलींना देत आहेत. या स्प्रेचा वापर एखाद्या व्यक्तीवर केल्यास किमान अर्धा तास तरी ती व्यक्ती डोळे उघडू शकणार नाही, एवढी या स्प्रेची ताकद आहे. यामुळेच हिमाचलमधील लहान मुलींपासून, तरुणी आणि महिला वर्गामध्ये त्या कमालीच्या लोकप्रिय झाल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)