आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्समध्ये भरणार विविध पदे ! "या' महिन्यात होणार मुलाखती

आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्समध्ये भरणार विविध पदे
Jobs
JobsEsakal

सोलापूर : आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेसने (एसीएमएस) विविध विभागांतील अध्यापन विद्याशाखा पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत ऍनाटॉमी, जनरल सर्जरी आणि ईएनटी, पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, जनरल मेडिसीन, गॉयनीसह विविध विभागांत भरती होणार आहे.

विविध विभागांतील एकूण 17 पदांवर भरती होईल. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत आणि पात्र देखील आहेत, ते एसीएमएसच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करताना उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे, की त्यांनी अधिसूचना चांगल्या प्रकारे वाचलेली आहे; कारण अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

पद भरतीचा तपशील

ऍनाटॉमी विभागात सहाय्यक प्राध्यापकांच्या 2 आणि शिक्षकांच्या 1 पदासाठी नेमणूक केली जाईल. त्याचबरोबर बायोकेमिस्ट्री विभागातील असोसिएट प्रोफेसर 1 आणि शिक्षक 1 तसेच पॅथॉलॉजी विभागात सहाय्यक प्राध्यापकाचे 1 पद भरले जाईल.

अशी होईल निवड

उमेदवारांची निवड निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतीच्या आधारे केली जाईल. याशिवाय मुलाखतीसाठी कोणत्याही टीए / डीएला पैसे दिले जाणार नाहीत. त्याचबरोबर या मुलाखती मे महिन्यात घेतल्या जाऊ शकतील. या संदर्भात सविस्तर अधिसूचना जारी केलेली नाही. अशा परिस्थितीत, या भरती प्रक्रियेत भाग घेत असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइटवर सतत भेट द्यावी.

असे राहील वेतन

  • सहयोगी प्राध्यापक : 1 लाख 30 हजार रुपये

  • सहाय्यक प्राध्यापक : 85 हजार रुपये

  • शिक्षक : 60 हजार रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com