नौदल प्रवेशाचा राजमार्ग

सैन्य दलातील तांत्रिकी अधिकारी म्हणून सन्मानाची व जबाबदारीची नोकरी या दोन्हींसाठीची निवड होण्यासाठीचा राजमार्ग हा ‘१०+२ बी टेक कॅडेट एंट्री स्कीम’द्वारे उघडतो.
Indian navy
Indian navySakal

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

बारावीनंतर नेव्हीमध्ये (नौदल) अभियांत्रिकी शिक्षण आणि त्याबरोबर सैन्य दलातील तांत्रिकी अधिकारी म्हणून सन्मानाची व जबाबदारीची नोकरी या दोन्हींसाठीची निवड होण्यासाठीचा राजमार्ग हा ‘१०+२ बी टेक कॅडेट एंट्री स्कीम’द्वारे उघडतो. ही कायमस्वरूपी होणारी निवड असते.

स्कीमचे नाव - १०+ २ (बी. टेक.) कॅडेट एंट्री स्कीम (एक्झिक्युटिव्ह आणि टेक्निकल ब्रांच)

पात्रता - अविवाहित मुले आणि मुली. निवडप्रक्रियेसाठीची वयोमर्यादा १६.५ ते १९ वर्षे आहे. उमेदवार बारावी सायन्समध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्समध्ये ॲग्रिगेट ७० टक्के असावेत. बारावी किंवा दहावीमध्ये इंग्लिश विषयात किमान ५० गुण असणेसुद्धा अनिवार्य आहे. या निवडीनंतर चार वर्षांच्या बी.टेक. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो.

रिक्त जागा

राष्ट्रीय स्तरावर साधारणत- ३० ते ३५ जागा असतात. दर वर्षी ही संख्या बदलू शकते. त्यातील मुलींसाठी जास्तीत जास्त अंदाजे ६ ते १० जागा असतात.

अर्ज कोण करू शकतात?

निवडप्रक्रियेसाठी जेईई मेन परीक्षेला बसलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. त्यांच्या गुणांनुसार असलेल्या ‘कॉमन रँक लिस्ट’च्या आधारे एसएसबीला पाचारण केले जाते. जॉईन इंडियन नेव्ही या संरक्षक दलाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. त्यासाठी कोणतेही शुल्क नसते. साधारणत- जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ही प्रक्रिया चालू होते आणि अंदाजे दोन आठवडे ही प्रक्रिया चालते. जेईई मेनचा स्कोअर आल्यानंतर एक वर्ष या निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठीचा वेळ असतो. अशी ‘एंट्री’ वर्षातून दोन वेळा असते.

एंट्रीचे टप्पे

बारावीनंतरची जेईई मेनची परीक्षा, एसएसबी परीक्षा, मेरिट लिस्ट, मेडिकल तपासणी, पोलीस - चारित्र्य तपासणी, उपलब्ध जागांनुसार निवड अशा पद्धतीने निवडप्रक्रिया पार पडते.

एसएसबी - साधारणत- बंगळूर, विशाखापट्टणम, भोपाळ, कोलकाता या ठिकाणी एसएसबी पार पडतात. या मध्ये २ टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात इंटेलिजन्स टेस्ट, पिक्चर पर्सेप्शन टेस्ट आणि ग्रूप डिस्कशन असते. यामध्ये यश आल्यास पुढील टप्प्यातील टेस्ट्ससाठी सामोरे जावे लागते. यांमध्ये मानसशास्त्रीय चाचणी, ग्रुप टेस्टिंगसह मुलाखत असते. साधारणत- चार दिवसांचा कालावधी यासाठी असतो. सर्व चाचण्या झाल्यानंतर प्राप्त झालेल्या एस.एस.बी.च्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते.

प्रशिक्षण

निवड झालेल्या उमेदवारांची चार वर्षांच्या बी टेक कोर्ससाठी निवड होते. यामध्ये अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग यांपैकी इंजिनीअरिंगचा कोर्स करता येतो. कोर्स पूर्ण झाल्यावर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची बी.टेक. ही पदवी मिळते. प्रशिक्षण कालावधीतील शिक्षणाचा, कपडे, पुस्तके, निवासाचा संपूर्ण खर्च इंडियन नेव्हीमार्फत केला जातो. प्रशिक्षण केरळ येथील इंडियन नेव्हल ॲकेडमी एझीमला येथे होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com