विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्राचा 'दे धक्का'; ऑफरलेटरनंतर अनेकांना नाकारल्या नोकऱ्या

विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्राचा 'दे धक्का'; ऑफरलेटरनंतर अनेकांना नाकारल्या नोकऱ्या

नवी दिल्ली - आघाडीच्या विप्रो, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा या आघाडीच्या आयटी कंपन्यांनी अनेक उमेदवारांना ऑफरलेटर्स दिल्यानंतरही नोकरी नाकारली आहे. कंपनीत रुजू करून घेण्याच्या प्रक्रियाला अनेक महिने उशीर केल्यानंतर कंपन्यांनी अखेर ऑफर लेटरच रद्द केले आहेत.

विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्राचा 'दे धक्का'; ऑफरलेटरनंतर अनेकांना नाकारल्या नोकऱ्या
पूर्वी मोदी शेतकरी समर्थक होते, दिल्लीत आले अन् बदलले; भाजप नेत्याचा घरचा आहेर

मिळालेल्या माहितीनुसार, टेक कंपन्यांकडून नोकरी नाकारलेल्या शेकडो उमेदवारांची प्रक्रिया सुमारे 3-4 महिने चालली होती. मात्र अखेरीस या उमेदवारांचे ऑफर लेटर रद्द करण्यात आले आहेत.

उमेदवारंनी म्हटलं की, सुमारे 3-4 महिन्यांपूर्वी टॉप टेक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. मुलाखतींच्या फेऱ्यांनंतर, त्यांना ऑफरलेटर देण्यात आली होते. त्यानंतर उमेदवार कंपनीत रुजू होण्याची वाट पाहात होते. मात्र कंपन्यांकडून कंपन्यांकडून उमेदवारांना देण्यात आलेले ऑफर लेटर रद्द केल्याचे पत्र पाठवण्यात आले आहे.

उमेदवारांनी म्हटलं की, टेक कंपन्यांनी पात्रता निकष आणि कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारावर ऑफरलेटर रद्द केले. तुम्ही आमच्या शैक्षणिक पात्रतेच्या निकषांची पूर्तता करू शकत नाही, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे तुम्हाला पाठवलेले ऑफरलेटर रद्द करण्यात येत असल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात आल्याचं बिझनेसलाईनने म्हटलं आहे.

विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्राचा 'दे धक्का'; ऑफरलेटरनंतर अनेकांना नाकारल्या नोकऱ्या
तुम्ही महागाई वाढवली, मी दिलासा देतोय, पण मी..; केजरीवालांचा भाजपला टोला

दरम्यान कंपनीत रुजू करण्यास विलंब किंवा ऑफरलेटर रद्द करण्याच्या बातम्या सहसा जागतीक पातळीवर आयटी क्षेत्रात मंदीची चर्चा सुरू झाल्यावर येतात. मात्र यामागचे मुख्य कारण म्हणजे, पैशांचा पुरवठा कमी झाल्यामुळे जगभरात व्याजदर वाढत आहेत. त्यातून आयटी क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी उपलब्ध होत असलेल्या पैशांचा पुरवठा कमी झाला आहे. याचा परिणाम काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या आणि अनेक दशकांपासून व्यवसाय करणाऱ्या दिग्गज टेक कंपन्यांवरही झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com