चार दिवसांचा आठवडाच आहे कामासाठी उत्तम, कर्मचारी राहतात अधिक कार्यक्षम आणि आनंदी - रिसर्च

युकेमधील १०० कंपन्यांपैकी जवळपास ६२ कंपन्यांनी आठवड्यातून ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी या प्रक्रियेची चाचणी केली आहे.
4 day workweek
4 day workweekesakal

4 Day Work Week : मागील काही महिन्यांपूर्वी ब्रिटनमधील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या बाजूने मोठा निर्णय घेतला होता. युकेच्या जवळपास १०० कंपन्यांनी मागील वर्षी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आठवड्यातून ३ दिवस सुट्टी आणि ४ दिवस काम ही प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला होता.

विशेष म्हणजे या १०० कंपन्यांमध्ये २६०० कर्मचारी काम करतात. या कंपन्यांनी हे देखील नमूद केले होते की, आठवड्यातील ५ व्या दिवशीचे पैसे ते देतील त्यात कोणतीही काटछाट केली जाणार नाही. शिवाय, या ४ दिवसांच्या वर्कवीकचा प्रोग्रॅम राबवताना कंपन्यांनी देशात मोठ्या विकासाची आणि बदलाची आशा व्यक्त केली होती.

युकेमधील या १०० कंपन्यांपैकी जवळपास ६२ कंपन्यांनी आठवड्यातून ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी या प्रक्रियेची चाचणी केली आहे. या चाचणी अंतर्गत ६ महिन्यांमध्ये हा 4 days work week चा प्रोग्रॅम यशस्वीपणे राबवण्यात आला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

4 day workweek
Work-Life Balance : आयटी कर्मचारी म्हणतायत मोठा पगार नाही, आयुष्यातील आनंद महत्त्वाचा; सर्वेक्षणात बाब उघड

या अभ्यासानुसार, Employee Retention  मध्ये जवळपास 57% वाढ झाली आहे. तसेच, या ४ दिवसांच्या आठवड्यामुळे कर्माचाऱ्यांच्या Time Satisfaction मध्ये तब्बल 42% वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

या कंपन्यांचा मागील वर्षीचा महसूल आणि या वर्षीचा महसूल यांच्यात तुलना केल्यास त्यामध्ये 35% वाढ नोंदवण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सकारात्मकतेमध्ये 14% वाढ नोंदवण्यात आली आहे, तर कर्मचाऱ्यांच्या Life Satisfaction मध्ये तब्बल 13% वाढ झाली आहे.

या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार केल्यास त्यात 13% वाढ नोंदवण्यात आली आहे. या 4 day work week च्या अंतर्गत कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनी Self Reported  work Ability चे प्रमाण 12% नोंदवले आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना मिळालेल्या कामाच्या समाधानामध्ये 8% वाढ झाली आहे.

4 day workweek
Work Balance Tips : ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ऑफिसमध्ये काम करताना बॅलन्स कसा ठेवावा ? फॉलो करा या टिप्स ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com