Akola Municipal Election 2025
esakal
योगेश फरपट
अकोला,ता. २६ः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढण्याचा घेतलेला निर्णय हा स्थानिक राजकारणातील एक निर्णायक टप्पा मानला जात आहे. विदर्भातील चारही महानगरपालिकांमध्ये महायुतीचा संयुक्त लढा राबवण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून अकोल्यातील संभाव्य जागावाटपानुसार भाजप ५५, शिंदे सेना १५ तर राष्ट्रवादी १० जागांवर लढण्याची शक्यता व्यक्त होते. यामुळे सत्ता समीकरणांचा तोल स्पष्टपणे महायुतीच्या दिशेने झुकताना दिसत आहे.