Sanjay Shirsat Family Victory : छत्रपती संभाजीनगरात पालकमंत्री शिरसाटांची मुलं विजयी; अंबादास दानवेंचा भाऊ पराभूत!

Chhatrapati Sambhajinagar Election 2026 Result : जाणून घ्या, विजयानंतर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री संजय शिरसाटांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांनी महापौर पदाबाबत नेमकं काय म्हटलंय?
Palak Mantri Sanjay Shirsat celebrates victory as daughter Harshada Shirsat and son Siddhant Shirsat win in Chhatrapati Sambhajinagar, while Rajendra Danve suffers defeat.

Palak Mantri Sanjay Shirsat celebrates victory as daughter Harshada Shirsat and son Siddhant Shirsat win in Chhatrapati Sambhajinagar, while Rajendra Danve suffers defeat.

esakal

Updated on

Sanjay Shirsat’s Daughter and Son Win: छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. तर त्या पाठोपाठ शिवसेना दुसऱ्या क्रमामांकवर आहे. दुसरीकडे ठाकरे गट मात्र तिसऱ्या क्रमांकावर दिसत आहे. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या दोन्ही मुलांचा या निवडणुकीत विजय झाला आहे. 

 प्रभाग क्रमांक १८ मध्ये हर्षदा शिरसाट या विजयी झाल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक २९ मधून सिद्धांत शिरसाट विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे हे मात्र प्रभाग क्रमांक १६ मध्ये पराभूत झाले आहेत.

 निवडणूक निकालानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्य कन्या हर्षदा शिरसाट म्हणाल्या की, या निवडणुकीत आमच्या प्रभागावर सर्वांचं लक्ष होते. निवडणुकीआधी आमच्या बाबत अनेकांनी काहीकाही बोललं. परंतु आमचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. याशिवाय, प्रभाग क्रमांक २९ मधीलही आमचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.

Palak Mantri Sanjay Shirsat celebrates victory as daughter Harshada Shirsat and son Siddhant Shirsat win in Chhatrapati Sambhajinagar, while Rajendra Danve suffers defeat.
PCMC Election Winning Candidate List: अजितदादांना सर्वात मोठा धक्का! पिंपरी-चिंचवडच हातातून गेली, संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी वाचा

मला आज आनंद होत आहे की, ज्यावरून बोललं जात होतं की या जागेमुळे युती तुटली. परंतु आज तीच जागा आम्ही जिंकलेलो आहोत. आमच्यासोबत सगळे शिवसैनिक आहेत, सर्वांनी यासाठी कष्ट घेतले आहेत. हा केवळ आमचा विजय नाहीतर सर्व शिवसैनिकांचा विजय आहे. आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे कारण, प्रत्येकाने आज जीव लावून मेहनत केली आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, आम्ही आज सर्वजण विजयी होवून महापालिकेत जात आहोत. आता आम्हाला असं काम करायचं आहे की, पुढील पाच वर्षानंतर आम्हाला लोकांकडे जायची वेळच आली नाही पाहीजे.

Palak Mantri Sanjay Shirsat celebrates victory as daughter Harshada Shirsat and son Siddhant Shirsat win in Chhatrapati Sambhajinagar, while Rajendra Danve suffers defeat.
Pune Municipal Results : पुण्यात मोठा राजकीय धक्का! प्रभाग 39 मध्ये गुंड बापू नायरचा पराभव, भाजपचा धडाकेबाज विजय

याशिवाय महापौर पदाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर हर्षदा शिरसाट म्हणाल्या, अजून तरी आरक्षण निघालेलं नाही. यावर मी अद्याप भाष्यही करू शकत नाही. कारण, आरक्षण निघेल आणि जी काही पुढे घडामोड होईल, त्या हिशोबाने सगळं काही होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com