

eknath shinde
esakal
कल्याण : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आता महापालिका निवडणुका कधी होणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून 'नारी शक्ती मेळावा' आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिंदे शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी निवडणुकीची तारीख जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.