'तिहेरी तलाक हटवून PM मोदींनी कोट्यावधी महिलांना दिलासा दिला'

राज्यात सपा, काँग्रेस हे पक्ष कायमचं मुस्लिम समाजाला खूष ठेणवण्याच्या प्रयत्नात असतात.
BJP
BJPesakal

युपीमध्ये आजपासून निवडणुकीला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून या राज्यात नेते मंडळींनी गाठीभेटींची रीघ लावली होती. यादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप्रत्यारोपही पहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा यूपीतील श्रावस्ती येथे भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी सपाचे अखिलेश यादव, राहुल आणि प्रियंका गांधी यांना धारेवर धरलं आहे. आज ते यूपीतील (UP Election 2022) श्रावस्ती येथे बोलत होते.

BJP
Punjab Election : शिरोमणी अकाली दल-भाजप युती होणार? मजेठियांनी केलं स्पष्ट

ते म्हणाले, चांदीचे चमचे घेऊन जन्मला आलेले सपाचे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि कॉंग्रेसचे राहुल, प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केंद्राच्या जन धन खात्याची खिल्ली उडवली आहे. त्यांना याचं महत्व समजलेलं नाही. परंतु या योजनेचा अर्थ आता त्यांच्या डोक्यात आला आहे. दर 3 महिन्यांनी साडेदहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा केले जात आहेत, असा त्याचा अर्थ असून तो आता त्यांना समजला आहे.

नड्डा पुढे म्हणाले, राज्यात सपा, काँग्रेस हे पक्ष कायमचं मुस्लिम समाजाला खूष ठेणवण्याच्या प्रयत्नात असतात. त्यासाठी ते तिहेरी तलाकचा विरोध करतात. पण त्यांना हे माहीत नाही की अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, इराण, इराक आणि इंडोनेशिया या देशांत तिहेरी तलाकची प्रथाच नाही. तिहेरी तलाक (Triple Talaq) या मुस्लिम देशांमध्ये नव्हता पणआपल्या धर्मनिरपेक्ष देशात होता. त्यामुळेच पंतप्रधान मोदींनी (PM Modi) कोट्यावधी मुस्लिम महिलांना स्वातंत्र्य दिले आहे, असाही दावा केला.

BJP
''...तरी तो दहशतवादी असतो'', चन्नी यांचा केजरीवालांवर निशाणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com