''...तरी तो दहशतवादी असतो'', चन्नी यांचा केजरीवालांवर निशाणा

Charanjit Singh Channi attack Arvind kejriwal
Charanjit Singh Channi attack Arvind kejriwale sakal

पंजाबमध्ये आज ११७ जागांसाठी मतदान (Punjab Election 2022) होत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीसिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी चमकौर साहिब येथील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर निशाणा साधला.

Charanjit Singh Channi attack Arvind kejriwal
Video: पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांची शिव मंदिरात प्रार्थना

अरविंद केजरीवाल सत्ता मिळविण्यासाठी काहीही करू शकतात. ते सत्तेसाठी देशाला तोडू देखील शकतात. इतकंच नाहीतर ते खलिस्तानचा पंतप्रधान होण्याचा प्रयत्न देखील करू शकतात. दहशवातवादी कितीही गोड असला तरी तो फक्त दहशतवादी असतो, असं चन्नी म्हणाले. तसेच भगवंत मान यांच्यावर देखील टिप्पणी केली. भगवंत मान यांना दारू पिण्याची सवय आहे आणि मला चहा पिण्याची सवय आहे, असंही चन्नी म्हणाले.

केजरीवाल आणि आम आदमी पक्षाने पंजाबला समजण्यात चूक केली आहे. त्यांना वाटतं की, पंजाबला दहशतवादी आवडतात. केजरीवालांनी दहशतवादाबाबत बोलले होते. हिंदूंना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. पण, हीच त्यांची चूक होती. पंजाब आणि पंजाबी कधीही असुरक्षित नव्हते आणि नसणार, असंही चन्नी म्हणाले.

पंजाबमध्ये काँग्रेसला बहुमत मिळणार असून काँग्रेसचाच मुख्यमंत्री बनेल असा दावा चन्नी यांनी केला आहे. अकाली दल आणि भाजपची मिलीभगत आहे. त्यांनी सच्चा सौदा वाल्यांचा समर्थन मिळालं आहे. इतकंच नाहीतर भगवंत मान यांनाही सच्चा सौदा वाल्यांचं समर्थन मिळालं आहे. पण, आम्ही सेक्युलर आहोत. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालतो, असं चन्नी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com