Karnataka Vidhansabha : हे आहेत कर्नाटक रिंगणातील कोट्याधीश आमदार!

कर्नाटकमध्ये बुधवारी (ता.१०) विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यातील २२४ जागांसाठी मतदान होत आहे.
Karnataka MLA Property
Karnataka MLA Propertysakal
Summary

कर्नाटकमध्ये बुधवारी (ता.१०) विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यातील २२४ जागांसाठी मतदान होत आहे.

बंगळूर - कर्नाटकमध्ये बुधवारी (ता.१०) विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यातील २२४ जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी निवडणुकीच्या रिंगणात दुसऱ्यांदा उतरलेल्या १८९ आमदारांची सरासरी मालमत्ता ४८.५९ कोटी रुपये आहे.

कर्नाटकात २०१८ आणि २०२३ मधील विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत आमदारांच्या सरासरी मालमत्तेत १९.४१ कोटी रुपयांची (६७ टक्के) वाढ झाली आहे.

‘असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स’ आणि कर्नाटक इलेक्शन वॉच’ या संस्थांनी या आमदारांच्या शपथपत्रांचे विश्‍लेषण केले आहे.

पुन्हा निवडणूक लढविणाऱ्या १८९ आमदारांपैकी १६८ जणांच्या संपत्तीमध्ये एक टक्क्यापासून १,१८८ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे आढळले असल्याचे अहवालात म्हटले आहे. २१ (११ टक्के) आमदारांच्या संपत्तीत ०.३० टक्के ते ६८ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com