
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे सूत्रांची माहिती आहे तर दूसरीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत मात्र शिंदेंनी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांचा निर्णय मान्य असेल अशी भूमिका मांडल्याने फडणवीसांचा मार्ग मोकळा झाला आहे. अशातच भाजपकडून एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामागे महायुतीत एकता असल्याचा संदेश जाईल असा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.