नव्या सरकारचा शपथविधी गुरुवारी पार पडला. आता शनिवारी (7 डिसेंबर) पासून राज्याचे विशेष अधिवेशन सुरु होत आहे. नव्या विधानसभा अध्यक्षांची 9 डिसेंबरला निवड होणार असून त्यासाठी भाजपकडून 8 डिसेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे. राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार की नवा अध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.