नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालामध्ये मतदारांनी ईव्हीएम मशीनवर (EVM) शंका उपस्थित करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती.
पंढरपूर : पूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या माळशिरस तालुक्यातील (Malshiras Assembly Constituency) मारकडवाडीत आज सकाळी नऊ वाजता प्रत्यक्ष बॅलेट पेपरवर मतदानाला (Markadwadi Ballot Paper Voting) सुरुवात झाली आहे. दरम्यान, मारकडवाडीत पाच डिसेंबर पर्यंत जमावबंदीचा आदेश लागू असतानाही येथील ग्रामस्थांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मतदान प्रक्रिया सुरू केली आहे.