Parivartan Mahashaktisakal
Maharashtra Election 2025 Result
Parvartan Mahashakti List : तिसऱ्या आघाडीची 10 उमेदवारांची यादी जाहीर; बच्चू कडूंसह 'हे' उमेदवार रिंगणात
महाराष्ट्रात यंदा विधानसभा निवडणुकीसाठी मविआ, महायुतीसह 'परिवर्तन महाशक्ती' नावाची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे.
मुंबई : महाराष्ट्रात यंदा विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी, महायुती या दोन प्रमुख युतींसह परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. या परिवर्तन महाशक्तीनं आपल्या १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी पक्षासह इतर पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे.

