
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 288 पैकी 236 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले. मात्र मागील तीन दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबतचा चर्चा काही प्रमाणात कमी झाली आहे कारण, राज्याचे काळजावाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी-शहा मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली आहे.