तासगावला 'तुतारी' विरुद्ध 'घड्याळ'; रोहित पाटलांना घेरण्यासाठी बेरजेचं राजकारण, धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता

Tasgaon-Kavathe Mahankal Assembly Election : अजितराव घोरपडे यांनाही अजितदादांच्या राष्ट्रवादीत खेचण्याची खेळी सुरू झाली आहे.
Tasgaon-Kavathe Mahankal Assembly Election
Tasgaon-Kavathe Mahankal Assembly Electionesakal
Updated on: 
Summary

माजी खासदार संजय पाटील हे मुंबईत तळ ठोकून आहेत. ते भाजपमधून खासदार होण्यापूर्वी राष्ट्रवादीतूनच विधान परिषदेवर आमदार म्हणून गेले होते.

तासगाव : सन १९९९ पासून आर. आर. आबा व कुटुंबीयांनी सहा निधानसभा निवडणुका ज्या ‘घड्याळ’ चिन्हावर लढवल्या ते चिन्ह आता विरोधकांच्या हाती लागलं आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जाणार, हे निश्चित झालं आहे. हे चिन्ह घेऊन माजी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हे मैदानात उतरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहित पाटील (Rohit Patil) यांना आव्हान देतील, अशी प्राथमिक माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com