

दिल्लीत अमित शहांसोबत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र आता त्यानंतर मुंबईत बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीचे नेते अमित शाहांची भेट घेण्यासाठी गेले होते. या भेटीवर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा यांच्यासोबत चर्चा होईल, अशी माहिती सामंतांनी दिली आहे.