
Aditya Thackeray,Milind Deora,Worli,2024 Election:
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील सर्वात चर्चेचा मतदारसंघ हा वरळी होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे या मतदारसंघातून पुन्हा आपली आमदारकी टिकवण्यासाठी मैदानात उतरले होते. पण, २०१९ चे आणि आताचे चित्र वेगळे होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुलाला निवडून आणण्यासाठी स्थानिक आमदार सचिन अहिर यांना आपल्या पक्षात घेऊन विरोध कमी केली. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उमेदवार उभा नव्हता केला. पण, यावेळी शिवसेना पक्षच फुटला आणि समोर शिंदे यांच्या शिवसेनेने मिलिंद देवरा यांच्यासारखा तगडा उमेदवार उभा केला. त्यात मनसेकडून संदीप देशपांडे उभे होते. असे असूनही आदित्यने गड राखला...