Maharashtra Nagaradhyaksha Results 2025
esakal
Nagaradhyaksha Results 2025 full List : राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल आज जाहीर झाला असून नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाचे एकूण १२९ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यानंतर शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राज्यातील सर्व विभागांमधील भाजपने तसेच महायुतीने बाजी मारली आहे. प्रत्येक विभागात सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष निवडून आले याची विभागनिहाय आकडेवारीही आता समोर आली आहे.