Manipur Assembly Election 2022: तामेई विधानसभा जागेवर अपक्ष उमेदवारांचे वर्चस्व

या जागेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार
Manipur Assembly Election 2022
Manipur Assembly Election 2022टिम ई सकाळ
Updated on

Manipur Assembly Election 2022: मणिपूरच्या तामेई विधानसभा सीटसाठी (Tamei Legislative Assembly Seat), 1967 पासून एकूण 12 निवडणुका झाल्या आहेत, ज्यामध्ये काँग्रेस पक्षाने 4 वेळा या सीटवर बाजी मारली आहे तर विशेष म्हणजे अपक्ष उमेदवारांनी तामेईची सीट सर्वाधिक ६ वेळा जिंकली आहे. त्यामुळे इथे सर्वाधिक अपक्षाचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट होते.

Manipur Assembly Election 2022
Punjab Election: चरणजित सिंग चन्नी, केजरीवाल गोंधळलेले; अमरिंदर सिंग

तामेई विधानसभेची सीट तामेंगलाँग जिल्ह्यांतर्गत येते. ही सीट अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव आहे. तामेई सीटसाठी दुसऱ्या टप्प्यात ३ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत या जागेवरून काँग्रेसचे उमेदवार किखओनबाओ न्यूमाई (Kikhonbou Newmai) निवडून आले होते. तर नागा पीपल्स फ्रंटच्या अवांगबो न्यूमाई (Awangbow Newmai) यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. उल्लेखनीय म्हणजे 2007 च्या निवडणुकीत अवांगबो नुमाई या जागेवरून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे २०२२ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये या जागेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com