Telangana Election : अमित शहा यांच्याकडे तेवढे सामर्थ्य नाही, समान नागरी कायद्यावरून ओवेसी कडाडले

आदिवासींना त्यांच्या संस्कृतीचे संरक्षण करण्याचा घटनात्मक हक्क आहे
Telangana Election
Telangana Election

हैदराबाद : ‘‘समान नागरी कायद्याची (यूसीसी) गरज नसताना देखील भाजप देशात तो कायदा लागू करण्याचे आश्‍वासन देत आहे,’’ असा दावा ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी केला. ‘‘वर्तमानात देशात खऱ्या अर्थाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आवश्‍यकता आहे. एखाद्या व्यक्तीवर त्याच्या वेशभूषेवरून आणि धर्मावरून टीका होणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे,’’ असे प्रतिपादन ओवेसी यांनी केले.

Telangana Election
Parenting Tips : वारंवार समजावून देखील मुले वाद घालतात?मग, 'या' ट्रिक्सचा वापर करून मुलांना लावा वळण

तेलंगणमध्ये सत्ता आल्यास सहा महिन्यात राज्यात समान नागरी कायदा लागू करू असे आश्‍वासन गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. त्यावरून टीका करताना ओवेसी म्हणाले, ‘‘मी शहा यांना आव्हान देतो, त्यांनी आदिलाबाद, खम्मम आणि वारंगळसारख्या भागात जाऊन आदिवासींना समान नागरी कायदा लागू करणार असल्याबद्दल सांगावे. पण शहा यांच्याकडे तेवढे सामर्थ्य नाही, कारण त्यांना माहीत आहे की, आदिवासी भाजपला नाकारतील.’’

Telangana Election
Hair Care Tips : हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी 'या' गोष्टीचा करा वापर, केसांना मिळतील फायदे

आदिवासींना त्यांच्या संस्कृतीचे संरक्षण करण्याचा घटनात्मक हक्क आहे, असे ओवेसी यांनी सांगितले. ‘‘तेलंगणमध्ये एमआयएमची ताकद वाढली असल्याने भाजप आणि काँग्रेस आमच्यावर टीका करत आहेत. मात्र त्यातून त्यांना लाभ होणार नाही, असे प्रतिपादन ओवेसी यांनी केले. नऊ वर्षांपासून भाजप केंद्रात सत्तेत आहे. या कालावधीत भाजपने देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केले आहे,’’ असेही ते म्हणाले.

तेलंगणातील काँग्रेसची सूत्रे भाजपकडे

‘‘तेलंगणचे काँग्रेसचे अध्यक्ष रेवंथ रेड्डी हे मूळचे रा. स्व. संघाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे सध्या तेलंगणमधील काँग्रेसची सूत्रे ही मोहन भागवत यांच्या हातात आहेत,’’ असा दावा ओवेसी यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com