SAM TV Exit Poll Proven Accurate
esakal
SAM TV Election Analysis : राज्यातील २८८ नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी २ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी मतदान पार पडलं होतं. त्याचा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यानुसार नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे साम टीव्हीने जाहीर केलेल्या एग्झिट पोलमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं सांगितलं होतं. हा अंदाज एकदम खरा ठरला असून निकालातही भाजपाला १२० जागांवर विजय मिळाला आहे.