Sonia Gandhi : सोनिया गांधी पहिल्यांदाच प्रचारात उतरणार

त्या हैदराबादमध्ये रोड शो करणार असून यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी सोबत राहणार आहेत
Sonia Gandhi
Sonia Gandhi esakal
Updated on

Sonia Gandhi : पाच राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारापासून दूर राहिलेल्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी उद्या (ता. २८) हैदराबादमध्ये प्रचारात उतरणार आहेत. त्या हैदराबादमध्ये रोड शो करणार असून यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी सोबत राहणार आहेत.

Sonia Gandhi
Share Market Tips: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणामुळे प्रचारात भाग घेत नाहीत. परंतु तेलंगण राज्याच्या निर्मितीमध्ये प्रमुख भूमिका असल्याने सोनिया गांधी यांनी यावेळी एक दिवस तरी प्रचारात सहभाग घ्यावा, अशी विनंती तेलंगण प्रदेश काँग्रेस समितीतर्फे करण्यात आली होती. तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळण्याची आशा असल्याने प्रचारात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी काँग्रेसतर्फे सर्व प्रयत्न केले जात आहे. यानुसार सोनिया गांधी यांचा उद्या, मंगळवारी रोड शो आयोजित केला आहे.

तेलंगणामध्ये येत्या ३० नोव्हेंबरला मतदान होणार असून उद्या सायंकाळी प्रचार संपणार आहे. सोनिया गांधी यांनी मिझोरामच्या निवडणुकीसाठी एक व्हिडीओद्वारे मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले होते. तसेच त्यांनी छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये सुद्धा व्हिडिओ संदेश देऊन मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले होते. परंतु तेलंगणात त्या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकीचा हा अखेरचा टप्पा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com