Telangana Election : तेलंगणमध्ये उद्या विधानसभेसाठी मतदान, रॅपिडोची विशेष सेवा पण मद्य विक्रेत्यांची पंचाईत

तेलंगणमध्ये गुरुवारी विधानसभेसाठी मतदान होणार आहे
Telangana Election
Telangana Election Esakal

हैदराबाद : तेलंगणमध्ये गुरुवारी (ता.३०) विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात मंगळवारी संध्याकाळपासून (ता.२८) मद्य विक्रेत्यांना पुढील दोन दिवस मद्यविक्री बंद ठेवावी लागणार आहे. अशातच तेलंगणातील सध्याच्या मद्य धोरणाची मुदत या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच गुरुवारी संपणार आहे. त्यामुळे राज्यभरातील मद्य विक्रेत्यांची पंचाईत झाली असून मंगळवारी संध्याकाळपर्यंत अधिकाधिक मद्यसाठा खपविण्याचा मद्य विक्रेत्यांकडून प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.

Telangana Election
Share Market Tips: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

तेलंगणातील उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील मद्यविक्रेत्यांसाठी आदेश काढला आहे, या आदेशानुसार किमान किरकोळ किमतीपेक्षा कमी किमतीत मद्य विकल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून अशापद्धतीने एखादा विक्रेता दोषी आढळल्यास त्याला तीन ते चार लाख रुपये दंड आणि सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे. त्यातच तेलंगणमध्ये एक डिसेंबर पासून नवे मद्यविक्री धोरण लागू होत असून त्यानुसार ज्यांना नव्याने परवाना मिळाला आहे अथवा ज्यांची नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशांनाच मद्यविक्री करता येणार आहे. यामुळे तेलंगणातील अनेक दुकानदारांची पंचाईत झाली आहे.

रॅपिडोची विशेष सेवा

तेलंगणात गुरुवारी विधानसभेसाठी होणाऱ्या मतदानानिमित्त रॅपिडो या खासगी वाहतूक कंपनीने हैदराबादमधील नागरिकांसाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. हैदराबादमधील दोन हजार ६०० मतदान केंद्रांच्या हद्दीतील नागरिकांना या सेवेचा लाभ होणार आहे. या कंपनीचे सहसंस्थापक पवन गुंटुपल्ली यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली आहे. ज्या व्यक्तींना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचणे शक्य नाही अशा व्यक्तींना रॅपिडो मतदान केंद्रावर घेऊन जाणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ही सुविधा देण्यात येणार असल्याचे गुंटुपल्ली यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com