Up Election: शेतकरी आंदोलनाचा फटका निश्‍चित

पश्चिमेत भाजपच्या खात्यातील जागा कमी होणार
UP Assembly Election
UP Assembly ElectionSakal

लखनौ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची मोठी टक्केवारी बघता शेतकरी आंदोलनाचा परिणाम झाल्याचे स्पष्ट होते. मागील वेळी पश्चिम पट्ट्यात ५८ पैकी ५३ जागा जिंकलेल्या भाजपच्या खात्यातील संख्या यंदा कमी होणार असे दिसते.

गेल्यावेळी भाजपला मुजफ्फरनगरमधील २०१३च्या दंगलीचा फायदा उठवीत ध्रुवीकरण करणे शक्य झाले होते. त्यावेळी जाट शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या पट्ट्यात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण झाली. यावेळी मात्र शेतकरी आंदोलनामुळे जाट शेतकरी आणि मुस्लिम यांच्यातील पारंपरिक युती पुर्ववत झाली.

UP Assembly Election
मुख्यमंत्री म्हणतात, 'राजीव गांधींच तुमचे वडील आहेत याचा पुरावा काय?'

प्रामुख्याने ग्रामीण भागातील ११ जिल्ह्यांत बदलाची सामुहिक भावना दिसून आली. हिंदुत्वाचा मुद्दा रेटून मतदारांना भारावून टाकण्याची भाजपची खेळी फारशी चालली नाही. आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवादी, खलिस्तानी, फुटिरतावादी असे शिक्के मारण्यात आले. त्यांतून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रचारातील वक्तव्य आगीत तेल ओतणारे ठरले. अखिलेश यादव-जयंत चौधरी या जोडीचा सारा राग खाली आणून १० मार्चनंतर या ठिकाणाचे सिमल्यात रूपांतर करू असे ते म्हणाले होते. जाट समाजाला हे वक्तव्य रुचलेले नाही. नामवंत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ही भाषा मुख्यमंत्र्यांना शोभते का, असा सवाल करून मुख्यमंत्र्यांच्या धमकीचे उलटे परिणाम होतील असे ठामपणे सांगितले. सपच्या काळात कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा मुद्दा भाजपकडून रेटण्यात आला, पण पश्चिम पट्ट्यात तो चाललेला नाही.

UP Assembly Election
Podcast: शाकाहार कराल तर 13 वर्ष जास्त जगाल ते बच्चू कडूंना कारावास

मायावती म्हणजे भाजप बी टीम?

मायावती यांचा बसप मागच्याच निवडणुकीत महत्त्वाचा घटक होता. आता मात्र पश्चिम पट्ट्यात त्यांची बरीच पिछेहाट झाल्याचे दिसून आले. यावेळी मायावती यांनी स्वतःला प्रचारापासून हेतुपुरस्सर दूर ठेवले. भाजपचा ‘बी’ टीम बनण्याची भूमिका त्या पार पाडत असल्याचे अनेक राजकीय तज्ज्ञांचे मत बनले. या पट्ट्यात त्यांनी अनेक मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरविले. यामागे मुस्लिम मतांमध्ये फूट पडावी आणि त्याचा अर्थातच भाजपला फायदा व्हावा डाव असल्याचे मानले जात आहे.

UP Assembly Election
देशात 'दोन अपत्ये' धोरणासाठी कायदा करा; भाजप नेत्याची लोकसभेत मागणी

‘राज्याला दंगलखोरांपासून दूर ठेवा’

कासगंज (उत्तर प्रदेश), ता.११ (पीटीआय) : उत्तर प्रदेशला गुंडांपासून आणि दंगेखोरांपासून वाचवायचे आहे. घराणेशाही लोकशाहीला धोका आहे. २०१७ च्या अगोदर काय काय घडले आहे, याचा अनुभव उत्तर प्रदेशच्या लोकांनी घेतला आहे. घराणेशाहीच्या लोकांना प्रतिभावंत लोक अडचणीचे वाटतात, अशा शब्दात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाचे नाव न घेता टीका केली. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमिकडे जाणाऱ्या मार्गावरील एका प्रमुख चौकास गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव देण्याच्या घोषणेचे मोदी यांनी स्वागत केले.

मोदी म्हणाले, की जे लोक आपल्या कुटुंबाबाहेरचे पाहत नाहीत, ते उत्तर प्रदेशचा विकास कसा करतील. घराणेशाहीचे लोक महालात राहतात, त्यांना वास्तवाची जाणीव नाही. घराणेशाही चालवणारे लोक बिथरले आहेत. हे सत्तेत आले तर लोककल्याणकारी योजनांना कुलूप लावतील, असा इशाराही दिला. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत श्रीराम जन्मभूमिकडे जाणाऱ्या एका प्रमुख चौकाला भारतरत्न लता मंगेशकर यांचे नाव देण्याचा संकल्प असल्याचे जाहीर केले.

आकाशवाणी प्रक्षेपण सुरू होताना किंवा त्यांचे विविध कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी जी विशिष्ट संगीत धून वाजविली जाते त्याला सिग्नेचर टयून असं म्हटलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com