Uttarakhand Elections समान नागरी कायदा आणू - धामी यांची घोषणा

धामी यांची ‘जुमलेबाजी
uttarakhand
uttarakhandsakal

डेहराडून :देशात हिजाबवरून वाद सुरू असतानाच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे. ‘‘भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात येईल,’ असे ते म्हणाले. निवृत्त न्यायाधीश, कायदेतज्ज्ञ समाजातील विविध वर्गांच्या नागरिकांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती समान नागरी कायदाचा मसुदा तयार करेल, असे धामी म्हणाले.

खतिमा येथे प्रचारादरम्यान आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत धामी बोलत होते ‘‘राज्यातील सर्व नागरिकांना समान हक्क मिळावेत, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. भाजपचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर या कायद्याचे स्वरूप ठरविण्यासाठी समिती स्थापन केली जाईल. समान नागरी कायद्यामुळे सर्व धर्मातील नागरिकांसाठी विवाह, घटस्फोट, जमीन- मालमत्ता आणि वारसा या बाबत एकच कायदा लागू होईल. यामुळे सामाजिक एक्य, स्त्री - पुरुष समानता, महिलांचे सबलीकरणाला पाठबळ मिळेल आणि राज्याची सांस्कृतिक-आध्यात्मिक ओळख आणि पर्यावरण यांचे रक्षण होईल,’’ असा दावा धामी यांनी केला.

uttarakhand
पाच राज्यातील निवडणुकानंतर पेट्रोलचे दर भडकणार?

‘‘ही घोषणी म्हणजे माझ्ये पक्षाचे आश्‍वासन असून उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर ते पूर्ण करण्यात येईल. ‘देवभूमी’ची संस्कृती आणि वारसा जपणे हे आमचे मुख्य कर्तव्य आहे. आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत, असे ते म्हणाले. समाजातील धर्म, जात आणि जमातींची परंपरा, रूढी विसर पडत आहे. देवभूमीच्या सर्व रहिवाशांच्या हिताचा सन्मान करण्याचा वेळ आता आली आहे. सर्व प्रकारे विकासाचे ध्येय निश्‍चित करून समान नागरी कायदा लागू केला जाईल, असे ते म्हणाले.

धामी यांची ‘जुमलेबाजी’

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या समान नागरी कायद्याच्या वक्तव्यावरून उत्तराखंडमध्ये थंडीतही राजकारण तापले आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या गरिमा दसौनी यांनी मुख्यमंत्र्यांची ही घोषणा म्हणजे केवळ ‘जुमलेबाजी’ असल्याची टीका केली आहे.

भाजप पराभवापासून बचाव करण्यासाठी अशा घोषणा करीत आहे. गेल्या पाच वर्षांपासून भाजपने उत्तराखंडच्या विकासासाठी काही केले नाही. आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशी घोषणाबाजी करीत आहेत, असे त्या म्हणाल्या.

भाजप नेत्यांचे समर्थन

मुख्यमंत्री धामी यांच्या या घोषणेचे भाजपचे खासदार यांनी समर्थन केले आहे. या कायद्यामुळे समाज एकरूप होईल. उत्तराखंडच्या विकासासाठी मुख्यमंत्री अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. धामी यांची घोषणा ऐतिहासिक असल्याचा दावा संघटन मंत्री बी.एल. संतोष यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com