प्रश्नोत्तरे

माझ्या बाळाला सोने मधात उगाळून दिले तर तो उलटी करतो. मधाऐवजी आईच्या दुधात सोने उगाळून दिले तर चालेल का?
Honey
HoneySakal

माझ्या बाळाला सोने मधात उगाळून दिले तर तो उलटी करतो. मधाऐवजी आईच्या दुधात सोने उगाळून दिले तर चालेल का? बाळाला मध देऊ नये असा बऱ्याच डॉक्टरांचा सल्ला असतो. काय करावे?

- अपूर्वा खेर, पुणे

आयुर्वेदात सुवर्णप्राशनाला खूप महत्त्व दिलेले आढळते. बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत सोने मधात उगाळून द्यायला सांगितलेले आहे. त्याचबरोबरीने संतुलन बालामृतसारखे रसायन बाळाला वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत देणे त्याच्या एकूण आरोग्याकरता अत्यंत उत्तम. मध योगवाही असल्याचा आयुर्वेदात उल्लेख आहे. त्यामुळे सोने मधात उगाळून दिल्यास बाळाचे पचन व कार्य हे दोन्ही उत्तम पार पडतात.

मध खात्रीशीर गुणवत्तेचा असावा. संतुलन मध आपण नवजात बाळालाही देऊ शकतो. खरा मध वासाला व चवीला उत्तम असतो, त्यापासून उलटी होण्याची शक्यता नसते. तरीही बाळाला मधात उगाळून देणे जमले नाही तर थेंबभर मधात सोने उगाळून त्यात अर्धा चमचा आईचे दूध मिसळून देता येईल, जेणेकरून सोन्याचा उपयोग बाळाच्या आरोग्याकरता होऊ शकेल.

माझे वय ४२ वर्षे आहे, गेले काही दिवस चालायला खूप त्रास होता, गाडीवर बसताना सुद्धा सतत दुखण्याची व जखडल्याची भावना येत होती. तपासणी केली असताल खुब्याच्या हाडाची (हिप जॉइंट) झीज झाली आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काय करावे याबद्दल काही मार्गदर्शन करू शकाल का? डॉक्टर म्हणत आहेत की काही वर्षे तपासणी करत राहून गरज वाटल्यास हिप जॉइंट बदलावा लागू शकेल. याकरता मी थोडा चिंतीत आहे. काय करावे?

- यशवंत मुतालिक, हैद्राबाद

खुब्याच्या हाडाची झीज होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. कारणानुसार वेगळ्या-वेगळ्या उपाययोजना कराव्या लागतात. तूर्त वातशमनाच्या दृष्टीने संतुलन प्रशांत चूर्ण तूपसाखरेसह घेण्याचा फायदा होऊ शकेल. त्याचप्रमाणे संतुलन अभ्यंग सिद्ध तेल संपूर्ण शरीराला आणि संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल कंबरेला व पाठीला नियमितपणे लावावे. संतुलन वातबल गोळ्या घेण्याचाही उपयोग होताना दिसतो.

या उपायांबरोबरच हाडांची भरून काढण्याच्या दृष्टीने शास्त्रोक्त पंजकर्म करून घेणे उत्तम. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वातशामक औषधांनी संस्कारित तेलाच्या बस्ती घेतल्यास, शरीराची शुद्धी करून घेऊन पिंडस्वेदन हा उपचार केल्यास उत्तम गुण होताना दिसतो. तेव्हा वेळ न घालवता तज्ज्ञांचे व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन या सगळ्या उपचारांची योजना करणे चांगले राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com