'हे' तीन पदार्थ खा; घोरण्याच्या आजाराचा त्रास कमी करा!

तुमची खराब जीवनशैली आणि खाण्याच्या बदलत्या सवयींमुळे अशाप्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात
Obstructive Sleep Apnea Food
Obstructive Sleep Apnea Food

लोकप्रिय संगीतकार बप्पी लाहिरी यांना घोरण्याशी संबधित ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (ओएसए) हा आजार असल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा आजार झोपेदरम्यान (Sleep) श्वास घेण्यात अडचणी येण्याच्या संदर्भात आहे. या आजारात श्वसनलिकेमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे ऑक्सिजन योग्य प्रकारे जाऊ शकत नाही. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते आणि रुग्णाचा मृत्यू होतो. तसे पाहिल्यास, प्रत्येक रोगावर उपचार आहेत. पण तुमची खराब जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्याच्या (Food) बदलत्या सवयींमुळे अशाप्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात. म्हणूनच तुम्ही रोज जीवनशैलीची काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते , खाण्याच्या सवयींमध्ये थोडा बदल केल्याने या गंभीर आजाराचे प्रमाण कमी होऊ शकते. यासाठी या तीन पदार्थांचा आहारात समावेश करावा. (Food That Helps to Prevent Obstructive Sleep Apnea)

Obstructive Sleep Apnea Food
घोरण्याच्या आजारामुळे झाले बप्पीदा यांचे निधन; जाणून घ्या नेमका आजार
काकडी
काकडी

१) मेलाटोनिन(Melatonin) समृद्ध आहार - तज्ज्ञांच्या मते, काही फळे आणि भाज्या नैसर्गिक पद्धतीने तुमच्या झोपेची पद्धत सुधारू शकतात. यासाठी आहारात शतावरी, चेरी, द्राक्षे, ब्रोकोली, काकडी यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा. कारण हे पदार्थ झोपेच्या संप्रेरकांनी समृद्ध आहेत. हे पदार्थ झोपण्यापूर्वी खाणे चांगले मानले जाते.

Obstructive Sleep Apnea Food
Water Weight म्हणजे काय? यामुळे वाढलेलं वजन असं करा कमी
omega 3 food
omega 3 food

२) ओमेगा३ युक्त पदार्थ - ओमेगा ३ फॅटी एसिड्स मुबलक प्रमाणात मेलाटोनिनचे उत्पादन कमी करण्यास मदत करते, हे सिद्ध झाले आहे. ट्यूना, सेलमन आणि झिंगा यांच्यात ओमेगा ३ फॅटी एसिड्स भरपूर प्रमाणात असतात.

Obstructive Sleep Apnea Food
व्यायामाच्या आधी अन् नंतर किती प्रमाणात पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य पद्धत
beans
beanse sakal

३) ट्रिप्टोफॅन समृद्ध आहार- ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल आहे. ते खाल्ल्याने नैसर्गिकरित्या अन्नाचे मेलाटोनिनमध्ये रूपांतरित होऊन झोपेचे चक्र सुधारण्यास मदत होते. चिकन, नट्स आणि बीन्स यांसारख्या पदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन भरपूर प्रमाणात असते. याचा फायदा स्लीप एपनियाने त्रस्त असलेल्या लोकांना होऊ शकतो.

Obstructive Sleep Apnea Food
Blood Sugar Level वयानुसार किती असावी? जाणून घ्या

या पदार्थांपासून राहा दूर

तज्ज्ञांच्या मते, स्टेक, डुकराचे मास, बेकन यासारख्या स्निग्ध पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे झोपेच्या दरम्यान श्वसनास अडथळा असलेल्या लोकांनी हे पदार्थ टाळावे. तसेच केळी खाणेही टाळावे, कारण त्यात पोटॅशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने घशातील श्लेष्माचे उत्पादन वाढते. त्यामुळे समस्या निर्माण होतात. तसेच जास्त चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनापासून दूर राहवे. कारण ते शरीरात श्लेष्माचे उत्पादन वाढवतात. त्यामुळे स्लीप एपनियाचा धोका वाढतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com