Potato Tornado Recipe: फक्त २० मिनिटात तयार होईल अशी चटकदार पोटॅटो टोर्नेडो रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Potato Tornado Recipe

Potato Tornado Recipe: फक्त २० मिनिटात तयार होईल अशी चटकदार पोटॅटो टोर्नेडो रेसिपी

Potato Tornado Recipe: चटपटीत आणि मसालेदार नाश्ता करण्याची इच्छा सगळ्यांना असते, पण सकाळच्या धावपळीत वेगळी रेसिपी ट्राय करणं लोकांना रिस्की वाटतं, तुम्ही ही रेसिपी करू शकतात, ही रेसिपी बनवायला फक्त २० मिनिटं लागतात. 

हेही वाचा: Hyderabadi Recipe : भांडी नव्हती म्हणून शिजवले दगडावर मटण! हैद्राबादच्याा या डिशची जगभर चर्चा!

पोटॅटो टोर्नेडो ही अशीच एक डिश आहे. ही फक्त 20 मिनिटांत तयार करता येते आणि चव अशी की ती कोणालाही प्रेमात पाडेल; सकाळ संध्याकाळच्या हलक्या फुलक्या नाश्त्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. 

हेही वाचा: Chutney Batata Recipe : तिच तिच भाजी पोळी खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा चटपटीत चटणी बटाटा रेसिपी

पोटॅटो टोर्नेडो 

साहित्य:

-  २ बटाटे

-  १/२ टीस्पून पेपरिका

- चवीनुसार मीठ

- १/२ टीस्पून चिली फ्लेक्स

- १/२ टीस्पून ओरेगॅनो

- १/२ टीस्पून काळी मिरी पावडर

- तळण्यासाठी तेल

हेही वाचा: Astro Tips : गुरुवारी या गोष्टी केल्याने व्हाल कंगाल, वेळीच व्हा सावध

कृती:

१. पोटॅटो टोर्नेडो बनवण्यासाठी बटाटे सोलून घ्या. बटाटा एका स्टीकवर ठेवा आणि चाकूने रिंगच्या आकाराचे स्पायरल कट करा.

२. सगळे मसाले एका भांड्यात काढून घ्या आणि चांगले मिक्स करून घ्या. आता हे मसाल्याचे सारण बटाट्यावर लावून घ्या. 

३. गॅसवर पॅन ठेवा. त्यात तेल टाकून गॅसवर गरम करायला ठेवा. फ्लेम मिडियम ठेवा. त्यात स्टीकसोबत स्पायरल टाका आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

४.  तुमचे पोटॅटो टोर्नेडो तयार आहेत. टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीसोबत पोटॅटो टोर्नेडो खा.