अभिनेत्री एकता लब्दे: आईची 'अळूवडी' द बेस्ट

अभिनेत्री एकता लब्दे: आईची 'अळूवडी' द बेस्ट
Updated on
Summary

तीळ लावून तळलेली आळुवडी म्हणजे खूपचं छान. माझी आई ही रेसिपी माझ्या आजीकडून शिकली आणि आता लॉकडाउनमध्ये मी तिच्याकडून शिकले.

मुळात मी फुडी आहे. मला वेगवेगळ्या प्रांतातले निरनिराळे पदार्थ खायला आणि ते बनवायला खूप आवडतात. पण, तरी मला मोदक आणि अळूवडी हे पदार्थ खूप जवळचे आहेत. माझे या दोन पदार्थांवर अतिशय प्रेम आहे. माझ्या आईने केलेले सगळेच पदार्थ मला खूप आवडतात; पण तरी माझी आई आळुवडी आणि सोलकडी, कांदेपोहे खूप उत्तम प्रकारे बनवते. तीळ लावून तळलेली आळुवडी म्हणजे खूपचं छान. माझी आई ही रेसिपी माझ्या आजीकडून शिकली आणि आता लॉकडाउनमध्ये मी तिच्याकडून शिकले.

अभिनेत्री एकता लब्दे: आईची 'अळूवडी' द बेस्ट
रेसिपी : मूग डाळ खांडवी

दरवर्षी श्रावण महिना आला की, माझी आई माझ्यासाठी आवर्जून आळूची पानं आणते. हा पदार्थ मी कधीही खाऊ शकते. माझी आई सगळेच पदार्थ उत्तम बनवते. सोबतच माझे बाबा देखील बेस्ट स्वयंपाक करतात. त्यांनी केलेलं सांबार मला खूप आवडतं. दोघंही मला आवडेल असे रुचकर पदार्थ बनवून देत असतात आणि मलाही शिकवत असतात. त्यांची बनवण्याची आवड पाहूनच मला तो पदार्थ आणखी चविष्ट लागतो.

Actress Ekta Labde
Actress Ekta Labdeesakal
अभिनेत्री एकता लब्दे: आईची 'अळूवडी' द बेस्ट
बिना लसणाचा टँगी टोमॅटो साॅस बनवा घरी, ही आहे रेसिपी

माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा माझ्या आईच्या हातच जेवण खूप आवडतं. मी नेहमी सेटवर जास्तीचा डब्बा न्यायचे. माझी मोठी आई (म्हणजेच मोठी काकू) मोदक खूप उत्तम प्रकारे बनवते. मी लहान असताना नेहमी सणसूद असलं की, आपण प्रामुख्याने नेवैद्यासाठी मोदक बनवत असतो, माझी मोठी आई जेव्हा मोदक बनवत असे, तेव्हा नेवैद्य दाखवण्याआधी ती तो मोदक तुपाची धार टाकून मला खाऊ घालत असे. लहान मुलात देव असतो, अशी तिची समज. अर्थात मी लहान होते तेव्हा, आता तसं होत नाही.

अभिनेत्री एकता लब्दे: आईची 'अळूवडी' द बेस्ट
खमंग चवीचे 'ब्रेड' कटलेट; जाणून घ्या सोपी रेसिपी

मी कोकणातली मालवणी असल्यामुळे मला कोकणी जेवण खूप प्रिय आहे. एकंदरीत कोकणातील सगळेच पदार्थ मला आवडतात. नारळाची वडी, आमसाट, फणसाची भाजी, घावणे, सोलकडी, सागोती वडे आणि इतर पदार्थ मला खूप आवडतात. मी जेव्हा इतर ठिकाणी फिरायला गेले की, मी आवर्जून तिथले प्रसिद्ध असणारे पदार्थ हमखास खाते आणि तो पदार्थ आवडला की त्याची रेसिपी विचारते. मी जेव्हा कोल्हापूरला गेले होते, तेव्हा मला कोल्हापुरी झणझणीत रस्सा खूप आवडला होता. पुण्याची पुणेरी मिसळ मला खूप आवडते. साऊथ रस्सम, गुजराती ढोकळा, पंजाबी लस्सी/ दही पराठे असे बरेच पदार्थ आवडतात.

अभिनेत्री एकता लब्दे: आईची 'अळूवडी' द बेस्ट
बाहेर खाण्याऐवजी घरी बनवून खा ब्रेड पकोडा, 'ही' आहे रेसिपी

लॉकडाउनचा मला सदुपयोग असा झाला की, मी उत्तम स्वयंपाक शिकले. काही पदार्थ आईकडून तर काही ऑनलाइन माहिती घेऊन शिकले. आता मी सगळा स्वयंपाक करू शकते, असं म्हणायला हरकत नाही. माझा न आवडता असा कुठलाच पदार्थ नाही किंबहुना मला जरी आवडत नसेल तरी मी त्याची नक्की टेस्ट घेते. अन्नाचा अपमान मला अजिबात आवडत नाही आणि तो कोणीही करू नये, यावर मी नेहमी ठाम असते. आपल्याला जितकं हवं तितकंच ताटात घ्यावं. डाएटिंग हा प्रकार जरा मला कमीच झेपतो. सहसा मी डाएट करत नाही. कारण, माझं असं म्हणणं आहे की आपण आपल्याला जे आवडतं ते नेहमीच खाल्लं पाहिजे. मन मारू नये. हल्ली वजन कमी करण्याच्या नादात आपण आपलं मन मारत जगत असतो. तंदुरुस्त राहता यावं यासाठी व्यायाम करणं हे उत्तम आहेच. मी ही नियमित व्यायाम करते. पण, मन मारून खाणं हे मला नाही जमलं. तुम्ही सुद्धा इच्छा असेल ते नक्की खा.

(शब्दांकन: अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com