esakal | खमंग चवीचे 'ब्रेड' कटलेट; जाणून घ्या सोपी रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

खमंग चवीचे 'ब्रेड' कटलेट; जाणून घ्या सोपी रेसिपी

पावसाच्या सरींसोबतच वाफळलेला चहा आणि ब्रेडचे कटलेट असा आनंद वाढवणारा क्षण एकदा तरी अनुभवावाच.

खमंग चवीचे 'ब्रेड' कटलेट; जाणून घ्या सोपी रेसिपी

sakal_logo
By
स्नेहल कदम

सध्या अनेक ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी सुरु आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गणेशोत्सवामुळे प्रसन्नतेचे, आनंदाचे वातावरण पसरले आहे. यातच या सरींमुळे अधून मधून काही चटपटीत, गरमा गरम खायची ईच्छा होते. यासाठी तुम्हाला आवडेल अशी एक सोपी रेसिपी म्हणचे ब्रेड कटलेट. ही साधी आणि सर्वांना आवडणारी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. यासाठी वेळही कमी लागतो आणि घरी असलेल्या साहित्यातून हा झटपट, चटपटीत पदार्थ तयार होतो. पावसाच्या सरींसोबतच वाफळलेला चहा आणि ब्रेडचे कटलेट असा आनंद वाढवणारा क्षण एकदा तरी अनुभवावाच. आणि त्याचसाठी ही सोपी रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहे.

हेही वाचा: बाहेर खाण्याऐवजी घरी बनवून खा ब्रेड पकोडा, 'ही' आहे रेसिपी

साहित्य -

 • साधा ब्रेड - १

 • भिजवलेले किंवा हिरवे वाटाणे

 • बारिक चिरलेली हिरवी मिरची - ४

 • हिंग पावडर - आवश्यकतेनुसार

 • गरम मसाला - आवश्यकतेनुसार

 • जिरे पावडर - आवश्यकतेनुसार

 • मीठ - आवश्यकतेनुसार

 • तेल - आवश्यकतेनुसार

 • रवा - २ वाटी

 • उकडलेला बटाटा - ४

 • कोथिंबीर - आवश्यकतेनुसार

हेही वाचा: Ladoo Recipe : आरोग्याला फायदेशीर; बनवा झटपट रवा-नारळ लाडू

कृती -

सुरुवातीला हिरवे वाटाणे मिक्सरमध्ये हलकेच बारिक वाटून घ्यावे. यानंतर उकडलेले बटाटे स्मॅश करुन घ्यावेत. यानंतर या बटाट्यात हिरवी मिरची, हिंग पावडर, जिरे पावडर, वाटलेले हिरवे वाटाणे, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ घालून मिश्रण एकजीव करावे. दुसऱ्या बाजूला ब्रेडचे काठ काढूव घ्यावे. त्याला पाण्यात घालून ओले करुन घ्यावे. यानंतर तयार मिश्रण या ब्रेडच्या स्लाईसमध्ये भरावे. ते बंद करुन त्याला फोल्ड करुन गोलाकार आकार द्यावा. यानंतर तयार कटलेटना भाजलेल्या रवामध्ये घालून एका बाजूला ठेवावे. एका पॅनमध्ये तेल गरम करुन घ्यावे आणि त्यात हे तयार कटलेट तळून घ्यावेत. तळताना गॅस मंद आचेवर ठेवावा, जेणेकरुन ते तळले आणि भाजले जातील. कटलेटचा रंग तांबूस झाल्यास ते शिजेलेत असे समजावे. तयार गरमा गरम कटलेट तुम्ही सॉस सोबत सर्व्ह करु शकता. किंवा गरम चहासोबत खाऊ शकता.

loading image
go to top