Recipe : अमृतसरी मच्छीची चव चाखायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fish Recipe

Recipe : अमृतसरी मच्छीची चव चाखायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा..

पंजाब म्हटंल की, सर्वात आधी आठवतं ती म्हणजे तेथील खाद्यसंस्कृती. पंजाबमध्ये प्रसिद्ध असणारे स्वादिष्ट पदार्थांची चव जीभेवर रेंगाळू लागते. चटकदार जेवणाची मसालेदार आणि तिखट चव प्रत्येकाची भूक भागवते. मात्र असे असेल तरी पंजाबी खाणाऱ्याचे मन काही भरत नाही. दरम्यान, आज आम्ही अशाच एका पंजाबी डिशचे नाव सांगणार आहे. जी तुम्ही घरी तयार करु शकता.

या डिशच नाव आहे अमृतसरी माच्छी. पंजाबमधील काही नामांकित डिशमधील ही एक उत्तम स्नॅक रेसिपी आहे. जी अगदी काही वेळात तयार होते. जर तुम्हाला सीफूड खायची आवड असेल, तर ही कुरकुरीत अमृतसर स्पेशल फ्राईड फिश तुम्ही नक्की ट्राय करू शकता. या रेसिपीसाठी तुमच्याकडे मासा असणे गरजेचे आहे. बेसन, दही, अंडी आणि लिंबाचा रस यांच्या पिठाची एक पेस्ट यासाठी वापरावी लागते. माशाचे हे तुकडे सोनेरी होईपर्यंत तळले जातात. ही रेसिपी चवीला तर रुचकर आहेच शिवाय खाणाऱ्याच्या जीभेवर ही चव दीर्घकाळापर्यंत राहते. चला तर मग जाणून घेऊया ही स्वादिष्ट अमृतसरी मच्छीची रेसिपी कशी बनवायवी...

हेही वाचा: Health : रिकाम्या पोटी खजूर खाण्याने खरचं फायदे होतात का? जाणून घ्या, खाण्याची योग्य वेळ

अमृतसरी मच्छी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 500 ग्रॅम फिश फिलेट / फिश फिंगर

  • 50 ग्रॅम आले लसूण पेस्ट

  • 10 ग्रॅम लाल तिखट

  • 20 मिली (मिली) लिंबाचा रस

  • 5 ग्रॅम सेलेरी

  • 200 ग्रॅम बेसन

  • 2 अंडी

  • 100 ग्रॅम दही

  • चवीनुसार मीठ

  • तळण्यासाठी तेल

अमृतसरी मच्छी बनवण्याची कृती

अमृतसरी मच्छी बनवण्यासाठी सुरुवातीला मासे स्वच्छ धुवून घ्या. यानंतर ती स्वच्छ धुवून त्याचे एकसारखे बारीक तुकडे करुन घ्या. आता त्यात मीठ, लिंबाचा रस, आले लसूण पेस्ट आणि लाल तिखट टाका. बेसन, दही, अंडी, कॅरम बिया, मीठ आणि पाणी घालून त्याचे एक पीठासारखे मिश्रण बनवून घ्या. या पिठात मासे 10 मिनिटांसाठी मॅरीनेट करा. आता कढईत तेल गरम करा आणि हे मॅरिनेट केलेले मासे हलके तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. आता माशांना चाट मसाला आणि लिंबाच्या फोडी घालून गरमागरम सर्व्ह करा.

हेही वाचा: Technology : इतरांच्या आधी मोबाईलवर नवीन गेम खेळण्यासाठी प्ले स्टोअरवर सेटिंग कशी कराल?

Web Title: Amritsari Recipe Traditional Punjabi How To Cook In Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..